World Forest Day 2024 : ‘या’ घनदाट जंगलात पुरुषांना No Entry; हिंमत करून गेलाच तर समजा गेलाच..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (World Forest Day 2024) दरवर्षी दिनांक २१ मार्च रोजी ‘आंतरराष्ट्रीय वन दिन’ साजरा केला जातो आणि आज तोच खास दिवस आहे. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू असा की, जंगल आणि त्यांचे महत्त्व याबद्दल जनमानसात जागरूकता वाढवणे. जगभरातील पहिला ‘जागतिक वन दिन’ हा २१ मार्च २०१३ रोजी साजरा करण्यात आला होता आणि तेव्हापासून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय वन दिन’ म्हणून दरवर्षी साजरा केला जात आहे. या खास दिवसाचे औचित्य साधून आज आपण एका अशा जंगलाविषयी माहिती घेणार आहोत जिथे पुरुष मंडळी जाण्याचा साधा विचारसुद्धा करत नाहीत. आता असं का? ते जाणून घेऊ.

Men’s Not Allowed

आजकाल तरुण मंडळींमध्ये एके फॅड आलं आहे, ज्यामध्ये काही तरुण आपल्या गाडीवर ‘Girls Not Allowed’ चा लोगो काढून घेतात. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या जगभरात एक असं जंगल आहे जिथे Men’s Not Allowed अर्थात पुरुषांना येण्यास सक्त मनाई आहे. (World Forest Day 2024) याचे कारण म्हणजे, या घनदाट जंगलात केवळ आणि केवळ महिला वास्तव्य करतात. त्यामुळे या महिलांच्या अज्ञातवासात पुरुषांनी ढवळाढवळ करून त्यांच्या आयुष्यात अडचणी निर्माण करू नये म्हणून या जंगलात वास्तव्य करणाऱ्या महिला पुरुषांना इथे येऊच देत नाहीत.

कुठे आहे हे जंगल? (World Forest Day 2024)

आपण ज्या जंगलाविषयी बोलत आहोत ते जंगल इंडोनेशिया देशात आहे. या जंगलाला ‘पापुआ’ म्हणून ओळखले जाते. तसं पाहिलं तर इथली सगळी जंगलं पवित्र आणि खास आहेत. मात्र हे जंगल इतर कोणत्याही जंगलापेक्षा थोडं वेगळं आहे. या जंगलाला येथील लोक ‘पवित्र जंगल’ म्हणूनही ओळखतात. कारण या जंगलात महिला वावरताना त्यांना भीती वाटत नाही. शिवाय अत्याचार, बलात्कार याची काळजी करणाऱ्या स्त्रिया इथं अगदी मनासारख्या मोकळ्या वावरू शकतात. कारण, इथं कुठल्याही पुरूषाला प्रवेश नाही.

कोणत्याही पुरुषाने जंगलात प्रवेश करण्याची हिंमत केली तर..

‘पापुआ’ या पवित्र जंगलात जर कोणत्याही पुरुषाने घुसखोरी करून प्रवेश केलाच तर त्याच काही खरं नाही हे समजा. कारण, अनेक पुरुषांचा अहंकार त्यांना असे करायला भाग पाडू शकतो. (World Forest Day 2024) दरम्यान हे साधं जंगल आहे त्यामुळे इथे कुठूनही शिरता येईल असा विचार करून कोणी पुरूष आत गेलाच तर त्याला त्यांच्या जमातीतील पंचांसमोर उभ केलं जात आणि कडक शिक्षा सुनावली जाते. कधी पैशात तर कधी अन्य प्रकारे शिक्षा दिल्या जातात. या शिक्षेदरम्यान ५ हजार रुपये दंड आकारला जातो.

असा आहे स्त्रियांचा अज्ञातवास

या पवित्र जंगलात केवळ स्त्रिया वास्तव्यास आहेत. ज्या आदिवासी जमातीतील असून दक्षिण आफ्रिकेतील महिलांसारखे त्यांचे राहणीमान आहे. या स्त्रिया संपूर्ण जंगलभर नग्न वावरतात. त्यांच्या शारीरियावर वेगवेगळी चित्रे गोंदवलेली दिसतात. तसेच त्यांची आभुषणे पक्षांची पिसे, शिंपले यांची असतात. (World Forest Day 2024) आपल्या उदर निर्वाहासाठी या महिला विशिष्ट प्रकारच्या शिंपल्यांची विक्री करतात. जगण्यासाठी आहार म्हणून त्या जंगलातील फळे आणि प्राण्यांचे सेवन करतात.

हे जंगल आमचं घर आहे..

एका वृत्तानुसार, या जंगलातील एका वृद्ध स्त्रीसोबत संवाद साधला असता तिने मनातील खंत व्यक्त केली आहे. या वृद्ध स्त्रीने म्हटले की, ‘हे जंगल आमचं घर आहे आणि जंगलंच उरलं नाही तर आमच्या जगण्याला काही अर्थ नाही. येथे अनेक पर्यटक येतात आणि समुद्रात प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा फेकतात. ज्यामुळे परिसर खराब होतो. समुद्र ही घाण पोटात घेत नाही. सर्व कचरा तो बाहेर फेकून देतो. यामुळे आमच्या जीवनमानावर याचा मोठा गंभीर परिणाम होतो’. (World Forest Day 2024)

‘हे जंगल सुरक्षित आणि स्वच्छ ठेवणे आपली जबाबदारी असूनही लोक याकडे दुर्लक्ष करतात याचे दुःख वाटते. आम्ही ज्यावर उदरनिर्वाह करतो त्यावरही याचा परिणाम होतो आहे. जंगल आधीसारखे स्वच्छ नसल्याने शिंपले शोधण्यात जास्त वेळ जातो आणि याचा परिणाम आमच्या कमाईवर परिणामी जगण्यावर होतो’.