Worlds Densest National Parks : सॅटेलाईटच्या माध्यमातून अशी दिसतात ‘ही’ घनदाट जंगले; फोटो पाहून व्हाल अवाक्

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Worlds Densest National Parks) अश्मयुगापासून मानवाने विविध प्रकारे वैयक्तिक प्रगती केली. यामध्ये माणूस प्रगतशील झालाच. शिवाय त्याच्या बुद्धीचा विकासदेखील झाला. यादरम्यान माणसाने विविध शोध लावले. ज्यांचा आज जागतिक पातळीवर मोठा वापर केला जात आहे. यामध्ये औद्योगिक क्रांतीसुद्धा झाली. शिक्षणाने माणसाला आणखी विकसित केलं. राहणीमान सुधारलं. लोकसंख्या वाढली. मोठमोठ्या बिल्डिंग, इमारती उभारल्या जाऊ लागल्या. सर्वत्र विकासाची विविध उदाहरणे उभी राहू लागली.

या दरम्यान अविकसित मानवाचा निवारा असणाऱ्या जंगलांचा मात्र मोठा ऱ्हास झाला. मानवाने स्वार्थासाठी प्रगतीचा मार्ग मोकळा करताना मोठ्या प्रमाणात जंगल तोड केली. या अमर्याद जंगल तोडीमुळे आज अनेक वन्यजीवांना देखील वास्तव्यास निवारा नाही. असे असूनही जगभरात आजही काही भव्य जंगले स्थित आहेत. जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये असणारी ही जंगलं आजही अनेक पशु पक्षांना आसरा देतात. यांपैकी काही जंगलांबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.

(Worlds Densest National Parks) नासाने जगभरातील भव्य राष्ट्रीय उद्यानांवर रिसर्च केले होते. दरम्यान अंतराळातून ही उद्याने कशी दिसतात याची काही छायाचित्रे नासाने शेअर केली आहेत. नासाचे अंतराळवीर आणि पृथ्वी निरीक्षण उपग्रहांच्या माध्यमातून ही जंगले अंतराळातून कशी दिसतात हे पहायला मिळत आहे. चला तर जाणून घेऊ ही राष्ट्रीय उद्याने कोणती आहेत? आणि ती अंतराळातून कशी दिसतात?

1. गॅलापागोस राष्ट्रीय उद्यान

गॅलापागोस राष्ट्रीय उद्यान हे १९५९ मध्ये इक्वाडोर येथे स्थापित करण्यात आले आहे. हे इक्वाडोरचे पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. इक्वाडोरच्या सरकारने गॅलापागोसच्या जमिनीचे ९७% क्षेत्र हे देशाचे पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून नियुक्त केले आहे.

2. डोनाना राष्ट्रीय उद्यान (Worlds Densest National Parks)

डोनाना राष्ट्रीय उद्यान हे दक्षिण स्पेनमध्ये आहे. जे त्याच्या आर्द्र प्रदेश, स्थलांतरित पक्षी, पाइन जंगले आणि किनारपट्टीवरील ढिगाऱ्यांसाठी ओळखले जाते. हे राष्ट्रीय उद्यान अभ्यागत केंद्रस्थान आहे.

3. लागुना सॅन राफेल राष्ट्रीय उद्यान

लागुना सॅन राफेल राष्ट्रीय उद्यान हे पॅटागोनियामध्ये दक्षिण चिलीच्या पॅसिफिक किनारपट्टीवर स्थित आहे. हे नॉर्दर्न पॅटागोनियन आइस फील्डचा भाग सॅन राफेल ग्लेशियरसाठी ओळखले जाते. (Worlds Densest National Parks) सॅन राफेल लेकमध्ये हिमनदीपासून तुटलेले बर्फाचे तुकडे आहेत. हे उद्यान विविध प्रकारच्या वन्यजीवांचे निवासस्थान आहे. इथे समुद्री ओटर्स, समुद्री सिंह, काळ्या मानेचे हंस आणि कंडोर्स प्राणी पाहायला मिळतात.

4. ग्रँड कॅनियन राष्ट्रीय उद्यान

ग्रँड कॅनियन राष्ट्रीय उद्यान हे अमेरिकेतील ॲरिझोनामध्ये स्थित आहे. लाल खडक आणि लाखो वर्षांचा भूवैज्ञानिक इतिहास या राष्ट्रीय उद्यानात आढळतो. इथे व्ह्यूपॉइंट्समध्ये माथेर पॉइंट, यावापाई ऑब्झर्वेशन स्टेशन, आर्किटेक्ट मेरी कोल्टरचा लुकआउट स्टुडिओ आणि तिचा डेझर्ट व्ह्यू वॉचटॉवर यांचा समावेश आहे.

5. ऑराकी/ माउंट कुक राष्ट्रीय उद्यान

ऑराकी/माउंट कुक राष्ट्रीय उद्यान हे न्यूझीलंडच्या दक्षिण बेटाच्या मध्य-पश्चिमेला असलेले राष्ट्रीय उद्यान आहे. (Worlds Densest National Parks) न्यूझीलंडचा सर्वात उंच पर्वत आणि माउंट कुक व्हिलेज या उद्यानात आहेत. या उद्यानाचे क्षेत्र 707 किमी² असे व्यापलेले आहे.

6. पोलिनो राष्ट्रीय उद्यान

पोलिनो हे राष्ट्रीय उद्यान कॅलाब्रिया आणि बॅसिलिकाटा या दक्षिण इटालियन प्रदेशातील संरक्षित पर्वतीय क्षेत्राच्या पट्टीत स्थित आहेत. येथे पाइनची झाडे, पायवाटा आणि अनेक नद्या आहेत. येथील प्रत्येक पॉईंट हा नेत्रदीपक आहे. इथे विविध जातीचे पक्षी आणि विविध प्राणी पहायला मिळतात.

7. इटोशा राष्ट्रीय उद्यान

इटोशा हे राष्ट्रीय उद्यान वायव्य नामिबियातील एक भव्य नैसर्गिक क्षेत्र आहे. हे राष्ट्रीय उद्यान आफ्रिकेतील सर्वात मोठ्या राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे. मार्च १९०७ मध्ये जर्मन दक्षिण पश्चिम आफ्रिकेचे गव्हर्नर फ्रेडरिक फॉन लिंडेक्विस्ट यांनी अध्यादेश ८८ मध्ये या क्षेत्राला राखीव अरण्य म्हणून घोषित केले होते. (Worlds Densest National Parks)