Xiaomi QLED TV X Pro: Xiaomi ने भारतात लाँच केली QLED TV X Pro सिरीज; पहा फीचर्स अन किंमत

Xiaomi QLED TV X Pro
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Xiaomi QLED TV X Pro – शाओमीने (Xiaomi ) 10 एप्रिल 2025 रोजी भारतात आपली नवीन स्मार्ट टीव्हीची घोषणा केली. Xiaomi QLED TV X Pro सिरीजमध्ये QLED डिस्प्ले दिला आहे. या सिरीजमध्ये 43 इंच, 55 इंच आणि 65 इंच आकाराचे टीव्ही सादर केले आहेत. या स्मार्ट टीव्हीमध्ये A5 चिपसेट, 2GB RAM आणि 32GB इनबिल्ट स्टोरेज आहे. नवीन शाओमी स्मार्ट टीव्ह्यांमध्ये MagiQ टेक्नॉलॉजी दिली आहे ज्यामुळे रंगांची गुणवत्ता आणि प्रोडक्शन सुधारण्याचा दावा करण्यात आलेला आहे.

Xiaomi QLED TV X Pro चे फीचर्स –

या स्मार्ट टीव्हीमध्ये 4K (2,160×3,840 पिक्सल) रिझोल्यूशन असून 178 डिग्री व्यूइंग एंगल आहे. डिस्प्लेमध्ये HDR10+, डॉल्बी व्हिजन आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटचा समावेश आहे. शाओमीने Vivid Picture Engine 2 आणि DLG (Dual Line Gate) टेक्नॉलॉजी दिली आहे. 55 इंच आणि 65 इंच वेरिएंटमध्ये 34W स्पीकर आणि 43 इंच मॉडेलमध्ये 30W स्पीकर दिला आहे. या स्मार्ट टीव्हींमध्ये Xiaomi Sound, Dolby Audio, DTS:X आणि DTS Virtual:X तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. तसेच टीव्हीमध्ये 2GB RAM आणि 32GB इनबिल्ट स्टोरेज आहे. MagiQ फीचरमुळे रंग अधिक प्रखर आणि आकर्षक बनविण्याचा दावा केला जातो. यामध्ये Filmmaker Mode देखील दिला आहे.

इतर वैशिष्ट्य –

शाओमीच्या नवीन टीव्हीमध्ये Google TV सोबत Patchwall UI, ब्लूटूथ, ड्यूल-बँड वाय-फाय कनेक्टिव्हिटी, आणि Xiaomi TV+ च्या लाइव्ह चॅनेल्ससाठी फ्री प्रवेश आहे. यामध्ये Apple AirPlay 2, Google Chromecast, Google Voice Assistant सपोर्ट, आणि Kids Mode पेरेंटल लॉकसह दिले गेले आहेत. Quick Wake, Quick Settings, आणि 3 HDMI, 2 USB पोर्ट्स, 1 ईथरनेट पोर्टसह विविध कनेक्टिव्हिटी पर्याय उपलब्ध आहेत.

Xiaomi QLED TV X Pro सिरीजची किंमत –

Xiaomi QLED TV X Pro स्मार्ट टीव्हीच्या 43 इंच मॉडेलची किंमत 31,999 रुपये, 55 इंच वेरिएंटची किंमत 44,999 रुपये आणि 65 इंच वेरिएंटची किंमत 64,999 रुपये ठेवण्यात आलेली आहे. भारतात या टीव्हीची विक्री 16 एप्रिलपासून फ्लिपकार्ट, मीडॉटकॉम आणि शाओमी रिटेल स्टोअर्सवर सुरू होईल. तसेच शाओमीने मे महिन्यात एक नवीन Xiaomi QLED TV A Pro 32 इंच वेरिएंट सादर करण्याची घोषणा केली आहे, पण त्याची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही.