Xiaomi चा नवीन Redmi A4 5G स्मार्टफोन लाँच ; पहा वैशिष्ट्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात आताच Xiaomi ने नवीन स्मार्टफोन Redmi A4 5G लॉन्च केला आहे. हा फोन नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये सादर करण्यात आला आहे. तसेच हा फोन दमदार प्रोसेसर सोबत लाँच करण्यात आला आहे. हा फोन लोकांच्या खिशाला परवडेल असा आहे. ग्राहकांना या फोनबद्दल आकर्षण वाटावे यासाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमुळे ग्राहकांचे लक्ष वेधण्याचे उद्दिष्ट आहे.

Redmi A4 5G ची वैशिष्ट्ये

या फोनच्या डिस्प्ले बदल बोलायचं झालं तर कंपनीने 6.52 इंच HD सोबत 90Hz रिफ्रेश रेट दिला आहे. फोनचे प्रोसेसर Snapdragon 4s Gen 2 चे आहे. ग्राहकांना आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. फोनच्या कॅमेऱ्यामुळे अनेक ग्राहक भारावून घेणे आहे. त्याचा कॅमेरा हा 50MP + 2MP चा असून , सेल्फी प्रेमींसाठी 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची ऑपरेटिंग सिस्टीम Android 14 वर आधारित असल्याचे दिसून येते . फोनची बॅटरी एवढी शानदार आहे कि , ग्राहकांना कमी वेळेत फास्ट चार्जिंग करता येईल . बॅटरीसाठी 5000mAh ची सोय उपलब्ध करून दिलेली आहे . म्हणजेच फोनला 18W फास्ट चार्जिंग होईल. कंपनीने उत्तम बॅटरी देण्याचा दावा केला आहे. ज्यामुळे तुमचा गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्याचा अनुभव चांगला होईल.

बाजारात फोनची किंमत

कंपनीने अजून फोनची किंमत ठरवलेली नाही . पण हा फोन ग्राहकांना 10000 रुपयांना उपलब्ध होईल असा अंदाज आहे. पुढील काही दिवसात कंपनी लवकरच आपल्या फोनची किंमत जाहीर करणार आहे.