शेतकऱ्यांना लखपती बनवणारा ‘हा’ व्यवसाय; कमी खर्चात देतो जास्त नफा

0
37
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येकाला आपला स्वतःचा व्यवसाय असावा असे वाटत असते. पण कोणता व्यवसाय करावा हे समजत नाही . अशा लोकांसाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. कारण तुम्हाला जर कमी गुंतवणुकीत जास्त फायदा मिळवायचा असेल तर लेमनग्रास (Lemon Grass) ची शेती करणे , उत्तम पर्याय ठरू शकतो. या ग्रासला बाजारात मोठी मागणी आहे. तसेच याचा विविध ठिकाण वापर केला जातो , ज्यामुळे तुम्ही लाखो रुपये मिळवू शकता. चला तर मग या व्यवसायाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

लेमनग्रास शेती –

तुम्ही जर एक हेक्टर क्षेत्रावर लेमनग्रास शेती केल्यास, एका वर्षात 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत कमाई केली जाऊ शकते. यासाठी तुम्हाला प्रारंभिक 20,000 ते 40,000 रुपये खर्च येऊ शकतात. दरवर्षी 3 ते 4 वेळा पिकाची काढणी केली जाऊ शकते. लेमनग्रास म्हणजेच ‘नींबू घास’, आणि याच्या तेलाची बाजारात मोठी मागणी आहे. एका हेक्टर क्षेत्रावर 100 ते 150 लीटर तेल मिळू शकते, आणि त्याचे बाजारमूल्य 1200 ते 1500 रुपये प्रति लीटर आहे.

बाजारात मोठी मागणी –

लेमनग्रास तेलाचा वापर सौंदर्यप्रसाधन, साबण, तेल आणि औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे याच्या बाजारमूल्यात चांगला फायदा होऊ शकतो. लेमनग्रास हे अत्यंत कमी पाण्याच्या क्षेत्रातही चांगले वाढते, म्हणूनच याची शेती सुक्या क्षेत्रांमध्येही सहज केली जाऊ शकते. याशिवाय, याला कोणत्याही प्रकारच्या खत लागत नाही.

कमी खर्चात जास्त नफा –

लेमनग्रासाची शेती करण्यासाठी फेब्रुवारी ते मार्च महिना योग्य मानला जातो . मार्च-एप्रिल महिन्यात नर्सरी बेड तयार करण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. याच्या उत्पादन क्षमतेत तीन वर्षांनंतर वाढ होऊ लागते. लेमनग्रास शेती ही कमी खर्चात उच्च नफा मिळवण्यासाठी एक उत्तम संधी आहे, ज्यामुळे तुम्ही व्यवसायात यशस्वी होऊ शकता.