जुन्या घरात सापडला खजिना; बॉक्स उघडताच तरुणीचं भाग्य उजळलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। तुम्हाला कधी लॉटरीचं तिकीट लागलंय..? किंवा मग एखादी अनपेक्षित डोळे दिपवणारी अँटिक वस्तू सापडली आहे..? अनेकदा आपल्याला असं वाटत कि अरे माझ्या हाताला अलादिनचा चिराग लागावा, त्यातून जीन बाहेर यावा आणि माझे सारे मनसुबे पूर्ण व्हावे. पण सत्यात असं घडणं कठीणच!! आणि त्यातूनही असं कुणाच्याबाबतीत घडलं तर त्याला भाग्यवान म्हणणे वावगे ठरणार नाही. असा भाग्योदय होणे फार कमी जणांच्या नशिबात असते आणि असंच एका तरुणीसोबत घडलं आहे.

आयुष्यात कधीच कल्पना केली नसेल असा एक प्रसंग अमेरिकेत घडला आहे. एक तरुणी आपल्या आईची भेट घेण्यासाठी तिच्या जुन्या घरी गेली होती आणि इथे तिला घबाड सापडलंय. एकीकडे सोन्याचे दर गगनाला भिडले असताना या तरुणीला गोल्डन लॉटरी लागली आहे. होय. आपल्या आईच्या भेटीसाठी जुन्या घरी गेलेल्या या तरुणीला चक्क सोन्याच्या दागिन्यांनी भरलेला ज्वेलरी बॉक्स सापडला आहे. एका वृत्तानुसार, या तरुणीचे नाव योलांडा डियाज आहे. ती एक कंटेंट क्रिएटर असून हा प्रसंग तिने टिकटॉकवर शेअर केला आहे.

यामध्ये योलांडाने सांगितले आहे कि, ती तिच्या आईला भेटण्यासाठी मेक्सिकोत त्यांच्या जुन्या घरी गेली होती. यावेळी तिला सोन्या- चांदीचे भरीव ऐवज असलेला ज्वेलरी बॉक्स सापडला. या बॉक्समध्ये सोन्याचे ब्रेसलेट, कानातले झुमके, अंगठ्या आणि तिच्या नावाच्या नेकलेसचा समावेश होता. टिकटॉकवर याबाबत सांगताना तिने आपल्या फॉलोवर्सला या दागिन्यांचे दर्शन घडविले आहे. याबाबत अधिक माहिती देताना तिने सांगितले कि, हे त्यांच्या जुन्या घरात सापडलेले दागिने तिच्या आजीचे आहेत. या दागिन्यांबद्दल तिला काहीही माहिती नव्हती. मात्र यात योलांडाच्या लहानपणीची बेबी ज्वेलरीदेखील होती.

एकंदरच हा बॉक्स पाहून योलांडाने आनंद व्यक्त केला. ती म्हणाली की, ‘दागिने मिळाल्यानंतर मी खूप आनंदी आहे. हे फक्त महागडे दागिने नाहीत. तर माझ्या आज्जीच्या जुन्या आठवणी आहेत. यातील प्रत्येक ऐवजामागे अनमोल किस्से दडले आहेत. या दागिन्यांमध्ये असे अनेक दागिने आहेत जे मी परिधान करुन शकते. मात्र, मी हे दागिने सांभाळून ठेवेल. कारण, ते जुने आणि अत्यंत अमुल्य आहेत’. योलांडाच्या या व्हिडिओला लाखो नेटकऱ्यांनी पाहिले असून असे प्रसंग फार क्वचितच घडल्याचे पहायला वा ऐकायला मिळतात. त्यामुळे या घटनेची सोशल मीडियावर बरीच चर्चा राहिली.