युझवेंद्र चहल- धनश्री वर्मा यांचा अखेर घटस्फोट

0
28
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट क्षेत्रातील दिग्गज खेळाडू युझवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर युट्यूबर धनश्री वर्मा यांच्या वैयक्तिक आयुष्यात काहीही ठीक नसल्याच्या चर्चा आपण सोशल मिडियाच्या माध्यमातून पाहत होतो. तसेच काही महिन्यांपूर्वी ते दोघे लवकरच घटस्फोट घेतील अशी चर्चा देखील सोशल मिडियावर रंगली होती पण त्यावेळेस त्या दोघांनीही यावर कुठलेच स्पष्टीकरण दिल नाही. पण आता अखेरी या दोघांचा कायदेशीर घटस्फोट झाला आहे. दोघांनी एकमेकांशी जुळवून घेता येणं कठीण झाल्याने या निर्णय घेतला आहे असे कोर्टाला सांगितले आहे.

चहल- धनश्री वर्मा यांचा अखेर घटस्फोट –

भारतीय क्रिकेट क्षेत्रात अनेक महिन्यापासून दिग्गज खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णयांमुळे त्यांना ट्रोल करण्यात आल्याच आपण पाहिलं. सगळ्यात आधी हार्दिक पांड्याला मोठ्या प्रमाणात त्याच्या क्रिकेटच्या निर्णयांमुळे ट्रोल करण्यात आलं , त्यानंतर त्याचा घटस्फोट झाला म्हणून देखील त्याला सोशल मिडियात मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आणि आता युझवेंद्र चहल चा घटस्फोट झाला आहे. गेल्या महिन्यातही चहलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेयर करत मेहनत, निष्ठा आणि चारित्र्य यासंदर्भात त्याने भाष्य केलं होतं. दोघानीही आपल्या घटस्फोटाच्या निर्णयावर स्पष्ट वक्तव्य केले नव्हते. पण कालच चहल आणि धनश्रीने देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सस्पेनशियल पोस्ट टाकून ते लवकरच वेगळे होणार आहेत याचे संकेत दिले होते.

अखेर वांद्रे इथल्या फॅमिली कोर्टात गुरुवारी या दोघांनी घटस्फोटाची औपचारिकता पूर्ण केली आहे . या दोघांनी एकमेकांच्या संमतीने घटस्फोट घेतला आहे. त्यामुळे आता हे दोघे पती पत्नीच्या बंधनातून मुक्त झाले आहेत.

चहल आणि धनश्री यांच लग्न –

चहल आणि धनश्री यांच लग्न 2020 साली झाले होते . सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. धनश्री डान्स कोरियोग्राफर असल्यामुळे दोघे ही डान्सचे रील करून सोशल मिडियावर पोस्ट करत असत आणि त्यांच्या फॅन्सला देखील ते आवडत असे. दोघांची जोडी लोकप्रिय झाली होती.

क्रिकेट क्षेत्रातील चहलची कामगिरी –

मधल्या काळात चहल च्या क्रिकेट करीयर मध्ये अनेक चढउतार आले. भारतीय संघात सिलेक्शन न होणं ते आयपीएल मध्ये RCB चा संघ सोडावा लागणं असो पण चहल ने हार मानली नाही. या सगळ्यात आयपीएलचा संघ बदलूनही त्याने आयपीएलमध्ये खूप चांगली कामगिरी करून दाखवली. चहलने 72 एकदिवसीय आणि 80 ट्वेन्टी20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान देखील चहलच्या नावावर आहे.