झहीर-सागरिका झाले आई-बाबा; चिमुकल्या बाळाचं नाव काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अन लखनऊ सुपर जाएंट्सचा कोच झहीर खान (Zaheer Khan) व अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. या जोडप्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं असून, या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. तसेच यामध्ये त्यांनी त्यांच्या बाळाचे नाव सुद्धा सांगितले आहे . तर चला या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

बाळासोबत सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर –

झहीर खानने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक गोड फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो अन सागरिका त्यांच्या बाळासोबत दिसत आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे, “प्रेम, कृतज्ञता आणि दैवाच्या आशीर्वादांसह आम्ही आमचा चिमुकला मुलगा फतेहसिंह खानचं स्वागत करतो.”

बाळाचं नाव ठेवलं ‘फतेहसिंह’ –

झहीर अन सागरिकाने त्यांच्या मुलाचं नाव ‘फतेहसिंह खान’ असं ठेवलं आहे. हे नाव जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच क्रिकेट अन चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी या जोडप्याचं अभिनंदन केलं आहे.

दिग्गजांकडून शुभेच्छा –

झहीर खान आणि सागरिकाच्या घरी आलेल्या या नवीन पाहुण्यामुळे त्यांचे चाहते देखील आनंदित झाले आहेत. या पोस्टवर सुरेश रैना, आरपी सिंग आणि अभिनेता अंगद बेदी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. चाहतेही झहीर आणि सागरिकाच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.