Zomato Pure Veg : शुद्ध शाकाहारींसाठी Zomato ची खास सुविधा; मांसाहारी ग्राहक झाले नाराज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Zomato Pure Veg) ऑनलाईन फूड डिलिव्हरी विश्वात झोमॅटो (Zomato) कंपनीचं चांगलं मोठ्ठ नाव आहे. त्यामुळे झोमॅटो कायम आपल्या ग्राहकांसाठी काही ना काही नवनवीन सेवा आणि सुविधा पुरविण्याच्या प्रयत्नात असते. दरम्यान, झोमॅटोने आपल्या शुद्ध शाकाहारी ग्राहकांसाठी एक अत्यंत खास सेवा सुरु केली आहे. झोमॅटोचे सह-संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल यांनी आपल्या नव्या सुविधेबाबत माहिती प्रदान केली असता नॉन व्हेज लव्हर्स मात्र नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

शाकाहारींसाठी झोमॅटोची खास सेवा (Zomato Pure Veg)

झोमॅटोच्या माध्यमातून आपल्या शाकाहारी ग्राहकांसाठी एक नवीन सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही शाकाहारी असाल आणि तुम्हाला मांसाहारी पदार्थ ज्या हॉटेलात मिळतात तिथून पदार्थ ऑर्डर करणे टाळायचे असेल तर त्यासाठी तुम्ही या सुविधेचा वापर करू शकता. या खास सेवेला ‘Pure Veg Fleet’ आणि ‘Pure Veg Mode’ असे नाव देण्यात आले आहे. या मोडमध्ये व्हेज ग्राहकांसाठी फक्त प्युअर व्हेज रेस्टॉरंट्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मांसाहारी पदार्थांची विक्री करणाऱ्या रेस्टॉरंट्सना वगळण्यात आले आहे.

काय म्हणाले Zomato चे CEO ?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या सुविधेबाबत माहिती देताना झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी सांगितले आहे की, ‘हा प्युअर व्हेज मोड आणि प्युअर व्हेज फ्लीट कोणत्याही विशिष्ट धर्म किंवा राजकीय पक्षाच्या सेवेसाठी आणलेला नाही. प्युअर व्हेज रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करू इच्छिणाऱ्या लोकांना या माध्यमातून विशेष सेवा मिळणार आहे. (Zomato Pure Veg) भारतात जगातील सर्वात जास्त शाकाहारी लोक राहतात. तसेच, आतापर्यंत आम्हाला मिळालेल्या फीडबॅकमधून हेच दिसून आलंय की शाकाहारी लोक हे आपल्या जेवणाच्या बाबतीत फार अलर्ट असतात, काळजी घेतात. आपल्याला समोर आलेलं अन्न कसं शिजवलं आहे याबाबत ते फार सतर्क असतात’.

मांसाहारी ग्राहक झाले नाराज

ही सेवा केवळ शाकाहारी ग्राहकांना प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे मांसाहारी ग्राहकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध कमेंट्स शेअर करत आपली नाराजी दर्शवली आहे. एका युजरने म्हटलंय, ‘झोमॅटोच्या प्युअर व्हेज सुविधेमुळे भेदभाव होऊ शकतो’. तर एकाने म्हटलंय, ‘झोमॅटो असा भेदभाव करणार असेल तर मी माझ्या फोनमधून हे ॲप काढून टाकतोय आणि मी पुन्हा कधीही Zomato चा वापर करणार नाही.’ (Zomato Pure Veg)