Zombie Drug : डेंजर!! नशा करण्यासाठी दफनभूमीतून चोरतात मानवी हाडे; कबरीतून लंपास केले जातात सांगाडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Zombie Drug) अलीकडच्या काळात अमली पदार्थांची तस्करी याविषयी मोठ्या प्रमाणात हालचाल दिसून आली आहे. सिनेविश्वातील विविध कलाकृतींमध्ये कथानकाची गरज म्हणून दाखवले जाणारे अमली पदार्थांचे सेवन करण्याची दृश्ये कुठे ना कुठे समाजात कुतूहल आणि आकर्षण तयार करत आहेत. प्रत्येक कलाकृतीच्या सुरुवातीला किंवा संबंधित दृष्यांसोबत तो पदार्थ शरीरासाठी हानिकारक असल्याची सूचना दिली जाते. मात्र कलाकारांची धुवा करण्याची स्टाईल आणि एकंदरच दाखवलेली दृश्य प्रत्यक्षात त्याविषयी सुप्त आकर्षण तयार करते.

नशाबाजीच्या प्रकरणात अनेक सिनेतारे, त्यांची मुले आणि विविध प्रतिष्ठित मंडळींच्या नावांचा अनेकदा उल्लेख होतो. मात्र, गेल्या काही काळात असे समोर आले आहे की, केवळ मोठ्या शहरांतून नव्हे तर गावांतूनही अमली पदार्थ विक्री सुरु आहे. त्यामुळे अगदी सामान्य घरातील मुलंदेखील या जाळ्यात ओढली जात आहेत. ज्यामुळे गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. (Zombie Drug) अशाप्रकारे यावर नियंत्रण मिळवणे जगासाठी आजच्या घडीला आव्हान बनले आहे. अशातच पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिऑन या देशातील एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. एका विशिष्ट प्रकारचे अमली पदार्थ बनवण्यासाठी इथे मानवी हाडांचा वापर केला जातोय. यासाठी कबरी खोदून सांगाडे चोरण्याचे प्रकार वाढल्याने या देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

कबरीतून मानवी सांगाड्यांची चोरी

पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिऑन या देशात एका विशिष्ट प्रकारचे अमली पदार्थ बनवण्यासाठी चक्क मानवी हाडांचा वापर केला जातो. याहून धक्कादायक बाब म्हणजे ही मानवी हाडे मिळवण्यासाठी इथे कबरी खोदून मानवी सांगाडे चोरी केले जातात. आतापर्यंत या अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या लोकांनी दफनभूमीतून अनेक सांगाडे लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अमली पदार्थाला ‘झोंबी ड्रग’ (Zombie Drug) किंवा ‘कुश’ या नावाने ओळखले जाते. हा अमली पदार्थ बनवण्यासाठी अत्यंत विविध विषारी घटक आणि मानवी हाडांची पावडर वापरली जाते.

देशाच्या अस्तित्वाला धोका

अमली पदार्थांच्या आहारी गेलेले लोक ज्या पद्धतीने दफनभूमीतील मानवी सांगाडे चोरी करत आहेत ते पाहून देशातील पोलिसांनी दफन भूमींना संरक्षण पुरवले आहे. (Zombie Drug) ‘झोंबी ड्रग’ तयार करण्यासाठी मानवी हाडे हा मुख्य घटक मानला जातो आणि त्यामळे अमली पदार्थांची चटक लागलेले लोक काही करून सांगाडे लंपास करू लागले आहेत. या प्रकारामुळे राष्ट्राध्यक्ष ज्युलिअस मादा बिओ यांनी देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न लक्षात घेऊन अमली पदार्थाचे सेवन रोखण्यासाठी देशात टास्क फोर्स स्थापन केली आहे.

‘झोंबी ड्रग्ज’ नेमका काय प्रकार आहे ? (Zombie Drug)

एका वृत्तानुसार, झोंबी ड्रग्ज हा असा अमली पदार्थ आहे जो नशा तयार करण्यात अत्यंत प्रभावी आहे. यात Xylazine चा वापर केला जातो. जो एखाद्या प्राण्यावर उपचार करताना त्याला भूल देण्यासाठी वापरला जातो. तसेच या ड्रग्जमध्ये कोकेन, हेरॉईन, फेंटानाईल यांचे मिश्रण देखील असते. अशा या पूर्ण मिश्रित अमली पदार्थाला ‘झोंबी ड्रग्ज’ म्हणून ओळखले जाते.

या ड्रग्जच्या सेवनाने माणसाची शुद्ध हरपते आणि त्याच्या हालचाली मंदावतात. इतकेच नव्हे तर या ड्रग्जचे सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर कोणत्याही जखमा झाल्यास त्याचे शरीर कुजू लागते. (Zombie Drug) हा ड्रग्जचा प्रकार अत्यंत घातक असून वेळीच याला आवर घातला नाही तर भविष्यात अनेक राष्ट्रांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते.