निर्भया प्रकरण: दोषी मुकेशचा फाशी टाळण्यासाठी आणखी एक कांगावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निर्भया सामूहिक बलात्कार खून प्रकरणातील दोषी मुकेश सिंग यांनी आता दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. घटनेच्या वेळी दिल्लीत नसल्याची मुकेशची याचिका खालच्या कोर्टाने याचिका फेटाळली होती. आता मुकेशने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून खालच्या कोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. मुकेशने दावा केला आहे की 16 डिसेंबर 2012 रोजी तो दिल्लीत नव्हता. मुकेशने केलेला हा दावा फाशी टाळण्यासाठी खेळलेला आणखी एक डावपेच म्हणून पाहिले जात आहे.

फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या मुकेशने पटियाला हाऊस कोर्टात अर्ज दाखल केला. यात त्याने सांगितले की घटनेच्या वेळी तो दिल्लीत नव्हता, अशा परिस्थितीत त्याची फाशीची शिक्षा रद्द करावी. परंतु, त्याचा हा अर्ज ट्रायल कोर्टाने फेटाळून लावला होता. त्यानंतर त्याने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाशी संपर्क साधला होता. सुप्रीम कोर्टाने मुकेशची याचिका फेटाळून लावल्याचे स्पष्ट केले आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाला त्याच्या वकिलास योग्य तो सल्ला देण्यास सांगितले. 5 मार्चला कनिष्ठ कोर्टाने 20 मार्च रोजी सकाळी साडेपाच वाजता दोषी मुकेशसिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय कुमार सिंग यांना फाशीची शिक्षा देण्याचा आदेश काढला आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment