‘भरारी घे जरा…न्यू ईयर@2020’

लाईफस्टाईल । एका कवीने खूप छान लिहून ठेवले आहे, “तू आहेस कोण हे समजू दे जरा, हृदयाने दिलेली हाक, तुझ्या मनापर्यंत पोहोचू दे जरा, उंच आभाळी भरारी घे जरा….”

दर वर्षाप्रमाणे आता हे वर्ष ही ३१ डिसेंबरच्या पार्टीने मागे पडले आणि आलेले नविन वर्ष काही नविन संकल्प करण्याचे स्वप्न घेऊन आले. ही सर्व स्वप्न पहात असतांना आधी आपण कोण आहोत हे समजून घेणं खूप महत्वाचे आहे. कारण त्या शिवाय आपण आपल्या यशाच्या हमीची भरारी घेऊ शकत नाही. आपल्या जीवनाचेही असेच असते, चांगले वाईट प्रसंग हे येतात आणि जातात. आयुष्य हे नकळत एक एक टप्पा पार करत पुढे जात असते. पुढे काय होणार हे आपल्याला माहित नसते. पण आलेल्या प्रसंगाला योग्यपणे सामोरे जाणे महत्वाचे असते. त्यामुळे येणारे आव्हाने झेलने, व पेलुन दाखवने यानेच जीवनाला अर्थ प्राप्त होईल.

यश-अपयशाचे अनुभव हे जीवन समृद्ध करण्यासाठीच आहेत. ते आपण किती सकारात्मकतेने घेतोे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते.

अनेकवेळा आपले यश अपयश हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून असते, त्यामुळे नेहमी सकारात्मक राहा. नकारात्मक विचार आणि विशेषतः नकारात्मक लोक यांच्यापासून सदैव दुरच रहा. बऱ्याचदा ह्या गोष्टी स्वतःच्या प्रामाणिक पणावर अवलंबून असतात. आपण जेवढे आपल्या कामाशी व आजुबाजुच्या व्यवस्थेशी प्रामाणिक राहतो तेवढे आपण यशाच्या व मानसिक स्वास्थाच्या जवळ असतो. एक छान सुविचार आहे, ‘स्वतःशी प्रामाणिक राहा म्हणजे जग आपोआपच तुमच्याशी प्रामाणिक राहील’.

प्रत्येकजण या पृथ्वीतलावावरती वेगळा आहे. त्यामुळे आपण कधीच स्वतःची तुलना दुसऱ्यांसोबत करू नये. स्पर्धा ही आपली आपल्याशीच असते. सगळ्या गोष्टी या आपणास सहजासहजी मिळतील असे नाही. त्याकरिता तग धरून ठेवणे हे खूप महत्वाचे आहे. यासाठी सातत्य, चिकाटी या गोष्टी आल्यातच.हे जग जितके बघता येईल अनुभव घेता येईल तेवढे अवश्य घ्या. कारण यामुळे जीवनात समृद्धि येईल.यशाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते. कोणाला आयपीएस, आयएएस, पीएसआय, एसटीआय, तलाठी, लिपिक…… प्रत्येकाच आपले स्वतंत्र ध्येय असते. त्यामुळे कोणी जर जिल्हाधिकारी झाला त्याला जेवढे समाधान असेल तेवढेच तलाठी/लिपिक/पीएसआय होण्यात असणार आहे. यावरून आपण आपले यशाचे,समाधानाचे गणित मांडणे आवश्यक आहे. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ यावरून आपण शक्य होईल तेवढे आपल्या ध्येयाच्या जवळ गेले पाहिजे.

गत वर्षात काही स्वप्ने अपूर्ण राहिली असतील तर हे येणारे वर्ष त्यासाठीच आहे, हे पाहून संकल्प करा. जर तुम्ही आतापर्यंत काही बाबतीत अपयशी ठरला असाल तर एका शायराचे हे बोल नेहमी लक्षात ठेवा……
“इक ख्वाब टूट गया तो क्या कुछ हुवा..?
जिंदगी ख्वाबों की सौगात है……
नींद अपनी,खयाल अपने है!”
एक स्वप्न तुटल तर काय मोठ बिघडल, आयुष्य म्हणजे स्वप्नांचीच मालिका आहे, झोपही आपली आणि विचारही आपलेच आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com