अखेर VIVO कंपनीसोबतचा करार स्थगित, BCCI ने केली अधिकृत घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत-चीन मधील वाढता तणाव पाहता देशभरात चिनी वस्तूंविरोधात वातावरण निर्माण झालं. बीसीसीआयनेही VIVO कंपनीसोबतचा करार मोडावा यासाठी सोशल मीडियावर दबाव वाढत होता.परंतू गव्हर्निंग काऊन्सिलने पहिल्यांदा VIVO कंपनीची स्पॉन्सरशिप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतू यानंतर देशभरात चाहत्यांची नाराजी व इतर जाहीरातदारांची नाराजी यामुळे बीसीसीआयने एक पाऊल मागे येत वर्षभरासाठी VIVO सोबतचा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

यासंदर्भात आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने परिपत्रक जाहीर करत याबद्दलची माहिती दिली आहे. २०१८ साली बीसीसीआय आणि VIVO कंपनीचा ५ वर्षांचा करार झाला होता. आयपीएल स्पर्धेच्या स्पॉन्सरशिपसाठी VIVO ने बीसीसीआयला २१९९ कोटी रुपये दिले होते. प्रत्येक हंगामाला VIVO कंपनी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये देत होती.

यंदाची IPL स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये होणार असल्याचे BCCI ने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.