अभिनंदन यांची गगनभरारी, मिग- २१ विमानाने केले उड्डाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र| पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडणारे भारतीय हवाई दलातील विग कमांडर अभिनंदन वर्तमान पुन्हा एकदा वायुदलात कार्यरत झाले आहेत. पाकिस्तानच्या तावडीतून सुटल्यानंतर अभिनंदन यांनी आज पहिल्यांदा पठाणकोट विमानतळावर मिग-२१ विमानाचे उड्डाण केले. यावेळी त्यांच्यासोबत हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआही या विमानात त्यांच्यासोबत होते. आज सकाळी ११.३० वाजता अभिनंदनने मिग-२१ विमानाने टेक ऑफ केले. अर्ध्या तासाच्या उड्डाणानंतर पुन्हा पठाणकोट विमानतळावर विमानाचे लँडिंग त्यांनी लँडिंग केले. हे विमान मिग-२१चं ट्रेनर व्हर्जन आहे.

यावेळी अभिनंदन यांचा लूक पूर्णत:हा बदलेला पाहायला मिळाला. यावेळी आपल्या अनोख्या मिशांची स्टाइल आणि हेअर स्टाइलमध्ये त्यांनी बदल केलेला दिसला. मात्र विमान उडवतानाचा त्यांचा जोश पाहायला मिळाला. यावेळी हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआही उपस्थित होते.

अभिनंदन यांनी पाकिस्तानचं एफ-१६ हे विमान हवेतच पाडलं होते मात्र त्याचवेळी त्यांच्या विमानाला या हवाई लढाईत नुकसान झाल्याने त्यांचं विमान भरकटून पाकव्याप्त काश्मीर हद्दीत कोसळले होते. विमान कोसळतांना त्यांनी पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर सुखरूप उतरले होते . मात्र दुरदैवाने पाकिस्तानी सैन्याने त्यांना आपल्या ताब्यात घेतले होते. दरम्यान भारताच्या कुटनीतीमुळे पाकिस्तानने अवघ्या २४ तासांत त्यांची सुटका केली होती.

Leave a Comment