टीम, HELLO महाराष्ट्र |केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आज अहमदाबाद येथील केडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. किरकोळ शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं, अशी माहिती रुग्णालयत व्यवस्थापनाकडून देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, अमित शहा यांना बुधवारी सकाळी ९ वाजता अहमदाबादमधील केडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया केली. दुपारी साडेबारा वाजता त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
अमित शहांवर ‘लिपोमा’ची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती केडी रुग्णालय व्यवस्थापनाकडून देण्यात आली. लिपोमा शस्त्रक्रिया म्हणजे त्वचेखालच्या अतिरिक्त चरबीसंबंधी आहे. अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. शहा याना काही दिवस विश्रांती घेण्यास सांगितले आहे. सध्या अमित शहा पुढील काही महिन्यामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीकडे लक्ष्य देत आहेत.