अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर दोन तास चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई: भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांची बहुचर्चीत आणि बहुप्रतिक्षीत अशी भेट अखेर मातोश्रीवर संपन्न झाली. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामधे बंद दाराआड दोन तास चर्चा रंगली होती. या प्रदिर्घ चर्चेमधे नक्की कोणता विषय चर्चिला गेला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन पक्षांमधील अंतर्गत ताण मातोश्रीवरील चर्चेमुळे कमी झाला असल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला राज्यात पत्करावा लागलेला पराभव, देशभरात विरोधकांची होत असलेली एकजूट आणि शिवसेनेनं दिलेला एकला चलो रे हा नारा, या अशा पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती होणार की नाही?, दोन पक्षांमध्ये निर्माण झालेली दरी मिटवण्यात अमित शहांना यश येणार का?, याची चर्चा या भेटीच्या निमित्तानं राजकीय वर्तुळात सुरू आहे. येणार्या काळात अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामधे अजुन २ ते ३ भेटी होण्याच्या शक्यता आहेत.

Leave a Comment