बारामती प्रतिनिधी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त भरवण्यात आलेल्या पुणे ते बारामती सायकल चावण्याच्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते बारामतीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सायकल चालवण्याच्या लहानपणीच्या आठवणी देखील सांगितल्या तेव्हा उपस्थितांमध्ये हास्य फवारे उडले.
सायकलीच्या आठवणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. सायकल हि प्रत्येकाच्या लहानपणीच्या खेळण्याचा ऐक भाग असते. मात्र तरुण वयात देखील सायकल वर डबल शीट बसवून सायकल चावण्याचा आनंद आणि कसब काही वेगळेच असते. मी सायकलवर मागे डबल शीट बसून सायकल चालवण्याबद्दल बोलतोय तुमच्या हसण्यावरून तर तुमच्या मनात नळीवर कोणालातरी बसवून डबल शीट सायकल चालवण्याचा प्रकार घोळतो आहे असे अमोल कोल्हे मोठ्या मिश्किलपणे म्हणाले तेव्हा उपस्थतींनांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि मुक्त हसण्याचा आनंद देखील घेतला.
आयुष्यभर पोटाच्या मागे धावणाऱ्याला उतार वयात पोट कमी करण्यासाठी सायकल चालवावी लागते. तर आयुष्याभर सायकल चालवणे कमीपणाचे समजणाऱ्यांना देखील म्हातारपणी पोटकमी करण्यासाठी सायकल चालवावी लागते असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत.