आंबा घाट खून प्रकरणामध्ये चार संशयितांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी। आंबा येथील कोंकण दर्शन पिकनिक पॉईंटवर गळा चिरून हत्या करण्यात आलेल्या खुनाचा छडा कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण ने लावला आहे. दारू पिऊन सतत दशहत, शिविगाळ करणाऱ्या संतोष तडके याचा काटा सख्या भावानेच तिघा साथीदारांच्या साह्याने काढला असल्याची कबुली मुख्य सूत्रधार संशयित संजय शरद शेळगे यांनी पोलिसांना दिली. या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी संजय शरद शेळगे (वय,३०), सुनील बाळू खोत (वय, ४३) आमिर उर्फ कांच्या अन्वर मुल्ला (वय,२२ तिघेही रा. गुरूकनांननगर,इचलकरंजी), सिद्राम शांताराम म्हेत्रे (वय,२५ रा.लिंबू चौक इचलकरंजी) यांना अटक करण्यात आली असून त्यांना इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण कडे वर्ग करण्यात आले.

इचलकरंजी कलानगर येथे मृत संतोष तडाके राहत होता. तो दररोज दारू पिऊन वादविवाद करत करून, दहशत माजवायचा. याचा राग संशयित आरोपी संतोष शेडगे याच्या मनात धुमसत होता. संतोषचा काटा काढण्यासाठी शेडगे याने साथीदाराच्या मदतीने प्लॅन केला. २० सप्टेंबर रोजी मृत तडाके याला पार्टीसाठी विशाळगड येथे जायचे असे सांगितले. त्यानुसार सायंकाळी सात वाजता मोटारीतुन संशयित आरोपी आणि संतोष तडाके हे विशाळगडच्या मार्गाने निघाले. आंबा विशाळगड मार्गावर संशयित आरोपी आणि मृत तडाके यांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर कोकण दर्शन पॉईंट येथे परत मद्यप्राशन करण्यास थांबले.

दरम्यान संतोष तडाके हा दारू पिऊन झोपल्यावर संशयित आरोपी संजयने संतोषच्या डोक्यात विळा मारला, इतर संशयितांनी हत्याराने संतोषवर वार केले. त्यानंतर संजयने संतोषचा विळ्याने गळा चिरला. संतोष मृत झाल्याचे समजताच संशयितांनी मृतदेह कोकण पॉइंटवरून फेकून दिला. मात्र, संतोषचा मृतदेह दरी पासून थोड्या अंतरावर अडकला.त्यामुळे हा खुनाचा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला.नागरिकांनी याबाबत पोलिसांत माहिती दिली. याची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी (दि.२४) सकाळी संशयित आरोपीना अटक केली.

Leave a Comment