आमदारांना पगार देऊ नका, शेतकऱ्यांना मदत करा; राज्यमंत्री बच्चू कडू यांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : राज्यमंत्री झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून आमदार बच्चू कडू यांचं नाव चर्चेत आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी दणका देत दोन नायब तहसील अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. शेतकरी वर्ग, अपंग बांधव यांच्यासाठी बच्चू कडू नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. आता त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी एक नवीन मागणी केली आहे. एकवेळ आमदारांना पगार देऊ नका, परंतु शेतकऱ्यांसाठी चांगल धोरण आखायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केले आहे. आमदारांसोबत आयएएएस अधिकाऱ्यांना देखील तीन महिने पगार देऊ नका अशी मागणी त्यांनी केली आहे.

एका बाजूला सर्व आमदारांची पगार वाढवण्याची मागणी सुरु असताना दुसऱ्या बाजूला बच्चू कडू मात्र त्यास विरोध करत आहेत. आमदार आणि आयएएस अधिकाऱ्यांना पगार न देता ते पैसे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावेत, अशी मागणी कडू यांनी केली आहे.

राज्यात सत्तेचा खेळ सुरु असताना नोव्हेंबरमध्ये राज्यात 300 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून गेल्या चार वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत एका महिन्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा हा आकडा सर्वाधिक असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सर्व संस्थांनी एकत्र येऊन याविषयावर एक धोरण आखलं पाहिजे, असेही बच्चू कडू म्हणाले.