हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर आणि सध्याचा क्रिकेट कॉमेंटेटर आकाश चोप्राने आयपीएल २०२० च्या मोसमातील पहिल्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सच्या बेस्ट प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. आकाश चोप्राच्या मते या अकरा खेळाडूंना घेऊन मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सामन्यात 19 सप्टेंबरला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मैदानात उतरू शकेल.
आकाश चोप्राने चार वेळचे आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सचे सलामीवीर म्हणून दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज क्विंटन डिकॉक आणि कर्णधार रोहित शर्मा यांची निवड केली आहे. जर दोघांनीही संघाला तुफानी सुरुवात दिली तर मुंबई संघ कोणतेही लक्ष्य साध्य करू शकतो आणि विरोधी संघाविरूद्ध सर्वात मोठी धावसंख्या बनवू शकतो, अस आकाशला वाटतं.
संघात चार अष्टपैलू खेळाडूंचा समावेश –
क्रिकेट तज्ज्ञ आकाश चोप्राने ईशान किशनला तिसर्या क्रमांकावर, तर सूर्यकुमार यादव यांना चौथ्या क्रमांकासाठी निवडलं आहे. त्याचबरोबर चोप्राने 5 व्या क्रमांकावर कॅरेबियन संघाचा दिग्गज अष्टपैलू किरॉन पोलार्डची निवड केली आहे. आकाश चोप्राने मुंबई संघात एक-दोन नव्हे तर चार अष्टपैलू खेळाडूंचा समावेश केला आहे. पोलार्ड व्यतिरिक्त हार्दिक पंड्या, क्रुणाल पांड्या आणि नॅथन कूल्टर नाईलचा या संघात समावेश आहे.
आकाश चोप्राने 6 व्या क्रमांकावर हार्दिक पांड्या, 7 व्या क्रमांकावर क्रुणाल पांड्या आणि 8 व्या क्रमांकावर नॅथन कूल्टर नाईल यांना अष्टपैलू म्हणून कायम ठेवले आहे. गोलंदाज म्हणून आकाश चोप्राने जसप्रीत बुमराह, ट्रेंट बाउल्ट आणि राहुल चहर यांना मुंबई इंडियन्सच्या संभाव्य सर्वोत्कृष्ट अंतिम 11 मध्ये स्थान दिले आहे. बुमराह आणि बोल्ट पूर्णपणे वेगवान गोलंदाज आहेत, तर राहुल चहर फिरकीपटू आहे.
आकाश चोप्राने निवडलेला मुंबई इंडिअन्सच्या अंतिम संघ –
रोहित शर्मा(कर्णधार), क्विंटन डिकॉक(विकेटकीपर), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, नाथन कुल्टर नाइल, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि राहुल चाहर
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’