आयशीअर टॅम्पो आणि दुचाकीच्या अपघातात विद्यार्थी जागीच ठार, दोघे गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे
विजापूर राष्ट्रीय महामार्गावर बोर्गी-बालगांव दरम्यान आयशर टेम्पो व दुचाकीचा अपघात होऊन बोर्गी येथील ओंकार उमेश देसाई हा महाविद्यालयीन तरुण जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची दुःखद घटना आज पहाटे साडे सहा वाजता घडली. रोड अपघात

मयत ओंकार देसाई हा बोर्गी येथील असून करजगी रोडला त्यांचे शेत आहे तेथुन तो व त्याचे वर्गमित्र संतोष अवजी आणि शिवमुर्ती पाटील हे तिघे मिळून दुचाकीवरून उमदी येथील महाविद्यालयात शिक्षणासाठी रोजच्या प्रमाणे जात असताना वाटेत माल वाहतुक करणार्‍या आयशर टेम्पोला समोरून धडकल्याने तिघेही दुचाकी वरून खाली पडले मात्र यात दुचाकी चालक देसाई यास डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, त्याचे दोन्ही मित्र देखील जखमी आहेत.

त्यांना विजापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याची माहिती वार्‍यासारखी पसरल्याने एकच गर्दी झाली होती. यावेळी नातेवाईकांनी हंबरडा फोडला अपघाती शाळकरी मुलांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करत आहे. घटनेची माहिती उमदी पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

Leave a Comment