कोल्हापूर /प्रतिनिधी : कागल येथील आयुष धर्माधिकारी यास स्केटिंगमध्ये घवघवीत यश संपादन केल्याबद्दल रामदास आठवले प्रतिष्ठानचा बेस्ट अँथलॅटिक पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
त्याने आत्तापर्यंत सेटिंग मध्ये एकूण 14 पदके मिळवली आहेत. यामध्ये चार सुवर्ण पाच सिल्वर, पाच कांस्य पदकांचा समावेश आहे. आतापर्यंत त्याने विविध स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे.त्याने विवा स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप 2017, विवा स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप 2018,थर्ड रेनी स्केटिंग चॅम्पियनशिप 2018,रुरल गेम स्केटिंग नॅशनल चॅम्पियनशिप 2018,फोर्थ स्टेट स्केटलॉन चॅम्पियनशिप 2019 अशा विविध स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे.
त्यांने 2018 मध्ये लार्जेस्ट खेलो इंडिया मल्टी डॉकटीव्हीटी स्केटिंग मॅरेथॉन कन्सेप्ट बाय प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी या अंतर्गत त्याने 72 तास स्केटिंग करून विक्रम केला होता.यामध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड,बेस्ट इंडिया रेकॉर्ड एशिया पॅसिफिक रेकॉर्ड,एशिया बुक रेकॉर्ड, ग्लोबल रेकॉर्ड, इंडियन अचिव्हर्स,नॅशनल रेकॉर्ड, चिल्ड्रन रेकॉर्ड, एक्स्ट्रीम रेकॉर्ड केले आहेत.शिवाय राज्यस्तरीय शालेय स्पर्धेमध्ये 48 तास स्केटिंग करुन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे.
2019 मध्ये झालेल्या वर्ल्ड रेकॉर्ड अंतर्गत मोस्ट स्टुडंट्स परफॉर्म स्केटिंग सेम टाईम इन मल्टिमल व्हेन्यू ही स्पर्धा खेळला आहे.2019 मध्ये एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत 96 तास स्केटिंग रेकॉर्ड केला आहे.यामध्ये त्याला इंडिया बुक रेकॉर्ड,बेस्ट इंडिया रेकॉर्ड,एशिया रेकॉर्ड, एशिया बुक,ग्लोबल रेकॉर्ड,इंडियन अचि व्हर्स,नॅशनल रेकॉर्ड, एक्स्ट्रीम रेकॉर्ड केले आहेत.शिवाय रेकॉर्ड इंडिया मोस्ट स्टुडन्ट परफॉर्म स्केटींग सेम टाईम इन मल्टिपल व्हेन्यू ही स्पर्धा खेळली आहे.