प्रतिनिधी, सतेज औंधकर : शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना एकेरी शब्द वापरल्याच्या निषेधार्थ भाजपाचे नेते व माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांचा निषेध करून येथील क्रांती चौकात शिरोळ तालुका शिवसेनेच्या वतीने पुतळा दहन करुन बोंब मारण्यात आली. नागरिकत्व दुरुस्ती कायदा या विषयावर चर्चा सुरू असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपाचे आशिष शेलार यांनी एकेरी शब्द वापरला.याच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभर निदर्शने होत आहेत.याच पार्श्वभूमीवर जयसिंगपूर येथील क्रांती चौकात मंगळवारी दुपारी बारा वाजता आशिष शेलार यांच्याविरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. तसेच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही केले.