ईव्हीएम बंद झाल्याशिवाय परिवर्तन नाही- वामन मेश्राम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी| ‘देश अराजकतेच्या दिशेने चालला आहे. लोकशाही पर्यायाने संविधान बदलवून टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. भारतीय जनता पार्टीन 2014 व 2019 च्या दोनही निवडणुका ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून जिंकल्यात. यात देशातील निवडणूक आयोगही सहभागी असून सुप्रीम कोर्टान दिलेला निर्णय ही पाळत नाही. तेव्हा देशात हुकुमत कुणाची हे लक्षात आल पाहिजे. म्हणूनच ईव्हीएम बंद झाल्याशिवाय देशात परिवर्तन घडणार नाही. अस मत बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी व्यक्त केलं. राळेगाव इथं झालेल्या बहुजन क्रांती मोर्चा ईव्हीएम भांडाफोड यात्रेच्या निमित्तान आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

वामन मेश्राम पुढे म्हणाले की,’ईव्हीएम मशीनमध्ये कॉंग्रेसन घोटाळा केला. नंतर भाजपाकडे सोपविला त्यांनी दोन्हीही निवडणुका ईव्हीएम मध्ये घोटाळा करूनच जिंकल्या’ असा आरोप त्यांनी केला. सोबतच या पुढे होणाऱ्या निवडणुका घोटाळा करूनच हे जिंकून येणार असल्याच त्यांनी स्पष्ट करून प्रत्येक गोष्टीचा आपल्या जवळ पूरावा असल्याच उपस्थितांना दस्तऐवज दाखवत ते बोलत होते. देशातील बेरोजगारी सह इतर विषयाला हात घालत पुढील संघर्षासाठी साथ सहयोग देण्याच आव्हान त्यांनी केले.

विकास चौधरी यांनी ओबीसी समाजाची दैनावस्थेबत बोलताना म्हणले की, ‘या सरकारन व आधीच्या सरकारन राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले व सावित्री बाई फुले यांना भारत रत्न दिला नाही. कारण तर ते ओबीसी आहेत. त्यामुळे ओबीसींनी सरकारला याच उत्तर मागितल पाहिजे.’

Leave a Comment