एटीएम फोडून पसार होण्याचा चोरट्यांचा ‘प्लॅन’ फसला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी। शहरातील एका बँकेचे एटीएम फोडण्याचा काल प्रयत्न करण्यात आला, परंतु पोलीस आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा एटीएम फोडीचा प्लॅन फसला. पोलिसांनी तत्काळ आपली सूत्र हलवत सदर एटीएम फोडी प्रकरणातील २ आरोपी सध्या पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, खोडे पार्क परिसर,स्टेटस हॉटेल च्या मागील बाजुस असलेल्या त्र्यंबक रोड वरील परिसरामध्ये आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आहे. या परिसरात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना काही जण हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आले. तेव्हा सदर घटनेची माहिती नागरिकांनी तातडीने पोलिसांनी दिली.मिळालेल्या माहितीवर कारवाई करत एटीएम फोडणाऱ्या पाच जणांच्या टोळीतील दोघांना पोलिसांनी पंचवटी परिसरात शिताफीने पकडले. मात्र बाकीचे चोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. त्यांच्याकडून काही दागिने देखील हस्तगत केल्याची माहिती समोर आली आहे. या अगोदर जव्हार परिसरात एका ज्वेलरी दुकानावर टाकलेल्या दरोड्याचा संशय देखील त्यांच्यावर आहे.

चोरटयांनी लक्ष केलेल्या या एटीएम वर सुरक्षारक्षक च नसल्याने या घटनेनंतर नागरिकांकडून याबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. एटीएम फोडण्यापूर्वी चोरटयांनी सीसीटीव्ही ची तोडफोड सुद्धा केली असल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस फौज फाटा दाखल झाला असून नाशिक पोलीस फॉरेन्सिक इन्वेस्टीगेशन टीम सुद्धा दाखल झाले आहे. या घटनेमुळे शहरातील एटीएम च्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Comment