हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा कोणतीही गोष्ट प्राप्त करायची असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. असे अनेक जणांकडून ऐकले असेल क्रित्येक वेळा मुलांच्या मार्गदर्शमध्ये सुद्धा या गोष्टींमध्ये जास्त भर दिला जातो. अनेक वेळा सांगितले जाते कि मेहनत आणि सातत्य या गोष्टींमुळे अनेक वेळा यशाची शिखरे गाठता येऊ शकते. हे चित्र सर्वात जास्त ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळते. मुलांकडे जिद्ध असते परंतु त्यांना त्यानुसार त्यांना मार्गदर्शन मिळत नाही. कि कोणाची साथ मिळत नाही.
अशीच एका मुलीच्या जिद्धीची कहाणी आहे. घराची गरीब परिस्थिती तसेच गाव एकदम दुर्गम भागात पण तिने तिची जिद्ध न सोडता आज ती ठामपणे आपल्या अभ्यासावर आणि मतांवर विश्वास आहे. स्वप्नाली सुतार असे तिचे नाव आहे. कणकवली तालुक्यातील दुर्गम अशा दारीस्ते गावातील ही युवती. लहानपणापासून इतकी हुशार आहे . दहावीत तिने चक्क ९८ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली . त्यानंतर तिने आपले शिक्षण पुढे घ्यायला सुरुवात केली सायन्स विषय घेऊन हि मी मुलगी चक्क बारावीत कॉलेज मध्ये प्रथम आली. त्यानंतर तिला डॉक्टरकीचे शिक्षण घ्यायचे होते. डॉक्टर व्हायची इच्छा होती. पण म्हणतात ना ज्याच्याकडे बुद्धी , मेहनत घायची तयारी आहे त्याच्याकडे मात्र पैसा नसतो. हीच गोष्ट तिच्या बाबतीत खरी ठरली आणि तिच्या स्वप्नाच्या मध्ये , मात्र तिची पण परिस्थिती आडवी आली. आई वडील शेतकरी,एवढा खर्च पेलवणारा नव्हता. म्हणून मुंबईला पशु वैद्यकीय अधिकारी होण्याचं शिक्षण घेत होती. तिचे खूप छान पद्धतीने अभ्यास सुरु होता. आणि कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन मध्ये गावात अडकली. मुलाचे शिक्षण सुटू नये किंवा मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून सर्वत्र ऑनलाईन शाळा सुरु केल्या आहेत. त्याच पद्धतीने तिचे तिकडे ऑनलाइन लेक्चर सुरू झाले. पण इतक्या सर्वसामन्य घरात जन्मलेल्या मुलीला ऑनलाईन चे साहित्य कुठून मिळणार . पण तिने जिद्ध सोडली नाही. अगदी लहान लहान गोष्टींवर मात करत ती शिकत आहे. शहरामध्ये मुलांना सगळ्या गोष्टी अगदी सहजरित्या प्राप्त होतात. पण तेच गावाकडच्या मुलांना छोट्या छोट्या
गोष्टींसाठी झगडावे लागते. तिच्या गावातील घराकडे साधे फोन येण्याचं नेटवर्क मिळत नाही त्या ठिकाणी इतक्या सहजासहजी इंटरनेट कुठून मिळणार. परत अँड्रॉइड मोबाईलचा ही प्रश्न होताच.मोठ्या भावाने आपला मोबाईल दिला खरा. त्यानंतर मात्र तरीही त्याचा मोबाईल घेऊन कुठे नेट मिळत नव्हते. अनेक वेळा प्रयत्न केले आणि यासाठी फिरत असताना डोंगरात नेट मिळालं.उन्हाळयात दिवसभर डोंगरावर झाडाखाली उभं राहून शिक्षण घेत होती.
सोनाली हि सकाळी ७ वाजता निघून रात्री ७ वाजता हा घरी येते. अख्खा दिवस डोंगरातील त्या झोपडीतच जातो. दिवसभराचे लेक्चर वारंवार सुरु असायचे त्यानंतर काही ठराविक वेळ झाला कि , आपोआप बॅटरी बंद व्हायची. पण चार्जिंग ची सोय कुठे असणार ना डोंगरावर.पुन्हा प्रॉब्लेम आला तो चार्जिंगचा.कुठल्यातरी मॅडमनी पॉवर बँक दिली.पावसाळा सुरू झाला. हे सगळं अश्या पद्धतीने सुरु झालं खरं पण नंतर अचानक पुन्हा संकट उभं राहिलं. ते म्हणजे पावसाचे . पण ती डगमगली नाही, ठाम राहिली.चार ही भावांनी डोंगरावरच एक छोटीसी झोपडी उभारून दिली. त्यानंतर हि मुलगी त्या झोपडीत राहून सध्या भर पावसात त्या छोट्याशा झोपडीतच निसर्गाच्या आणि पशु पक्षांच्या सान्निध्यात तिचा अभ्यासाचा दिनक्रम सुरू आहे. ध्येय साध्य करण्याची जिद्द ,महत्वकांक्षा मनात असेल तर अडथळे किती क्षुल्लक ठरतात ना. याची प्रचिती तिच्या माध्यमातून जगाला दाखवून दिली. तिला अभ्यासाशिवाय काहीच सूचत नाही असे तिच्या वडिलांची प्रतिक्रिया असते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’