कन्नड तालुक्यातील दोन युवकांचा कुंडात बुडून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी |

जोरदार पाऊस झाल्याने बहरलेले नैसर्गिक सौंदर्य पाहण्याच्या उत्सुकतेपोटी फिरण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा कुंडात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी कन्नड तालुक्यातील पितळखोरा लेणी येथे घडली. दोन युवकांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कन्नड तालुक्यातील आंबातांडा येथील युवक योगेश विलास भोंगळे व मुंडवाडी येथील शरद रामचंद्र साळुंखे हे दोघे आते मामे भाऊ होते हे दोघे औरंगाबाद येथून पितळखोरा लेणी बघण्यासाठी गेले असता. दुपारी दीडच्या सुमारास दोघेही पितळखोरा येथील पाण्याच्या कुंडाकडे गेले होते. कुंड बघत असतांना दोघेही अचानक कुंडातील पाण्यात पडल्याचे एका पर्यटक महिलेने बघितले.

महिलेने या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना सांगितली. स्थानिकांनी तत्काळ या घटनेची माहिती कन्नड ग्रामीण पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कुंडात शोधकार्य सुरू केले. दोन तासानंतर दोघा युवकांचा शोध लागला. दोघांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

Leave a Comment