करोनामुळं कोल्हापूरात मनपाची उद्याने 31 मार्च पर्यंत बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
महानगरपालिकेची सर्व उद्याने 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आज (दि.16) महापालिका प्रशासनाने घेतला. सध्या भारतामध्ये आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून याबाबत आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधीत अधिकाऱ्यांची आयुक्त कार्यालये आढावा बैठक घेतली.

यावेळी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजार राज्यात पसरत असून खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक घराघरात जाऊन आरोग्य विभागामार्फत सर्व्हेक्षण करण्याचे आदेश आरोग्याधिकारी यांना दिले. अंडी उबवणी केंद्र व आयसोलशेन हॉस्पीटील येथे अलगीकरण कक्षामध्ये किमान 100 संशयीत रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था करा. त्या परिरात वांरवार औषध फवारणी करा, प्रत्येक प्रभागात कोरोनाबाबत प्रबोधन व उपाय याबाबत फलक लावण्यात यावेत. 81 प्रभागात टिपरवरुन जनजागृती करा. के.एम.टी. बस व रथाद्वारे प्रसारण व जनजागृती करण्यात यावी. महापालिकेच्या शाळेतील मुख्यध्यापक व शिक्षक यांची आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणासाठी मदत घ्यावी अशा सूचना त्यांनी अधिकाऱयांना केल्या.

आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील यांनी आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये 30 रुम्स आहेत. त्यासर्व रुममध्ये बेड्सची व्यवस्था करण्यात येत असून येथून पुढे याठिकाणी संशयित रुग्ण दाखल केले जातील. आयसोलेशनमधील रुग्ण सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रणजित चिले, उप-शहर अभियंता हर्षजीत घाटगे, रमेश मस्कर, रावसाहेब चव्हाण, बाबुराव दबडे, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर आदी उपस्थित होते.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment