कर्जत-जामखेडमध्ये घडले ‘महाराष्ट्र धर्मा’चे दर्शन; राम शिंदेंनी बांधला रोहित पवारांना फेटा !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले आहेत. राज्यात पुन्हा एकदा युतीचं सरकार येणार हे स्पष्ट झालं आहे. भाजपने सर्वाधिक जागा मिळवत आपले स्था कायम राखले. दरम्यान यामध्ये संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या लढतींपैकी एक लढत होती ती कर्जत जामखेडमधील राष्ट्रवादीचे रोहित पवार विरुद्ध भाजपचे राम शिंदे यांच्यातील. पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात उतरलेल्या रोहित पवार यांनी विद्यमान मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला.

टीका टिपण्णी आणि आरोप प्रत्यारोपांनी गाजलेली कर्जत जामखेडची निवडणूक गाजली होती. मात्र रोहित पवार यांनी निवडणुकीतील सर्व मतभेद बाजूला ठेवून, विजयानंतर राजकीय सभ्यतेचं दर्शन घडवलं. रोहित पवार यांनी विजय मिळवल्यानंतर राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. इतकंच नाही तर राम शिंदे यांच्या मातोश्रींच्या पाया पडून त्यांचेही आशीर्वाद रोहित पवार यांनी घेतले. राम शिंदे यांच्या कुटुंबियांनीही रोहित पवार यांचं स्वागत आणि मान-पान केलं. शिंदे कुटुंबियांनी रोहित पवार यांना मानाचा फेटा आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत केलं.

पवार यांनी राम शिंदे यांच्या मातोश्रींच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. रोहित पवार म्हणाले, “आशीर्वाद असूद्या, विकासासाठी कटिबद्ध आहे. कार्यकर्त्यांचं विकासाबाबत कोणतंही भांडण नको, विकासाबाबत सर्वांनी एकत्र राहावं. एवढंच मला सांगायचं होतं” रोहित पवार यांनी राजकीय सभ्यता आणि सुसंस्कृतपणा दाखवल्याने त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. यापूर्वी कोल्हापुरातील शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी विजयानंतर राजू शेट्टी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

Leave a Comment