कर्नाटक पोलिसांची मुजोरी; राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांना धक्काबुक्की करत घेतलं ताब्यात, वाचा सविस्तर रिपोर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापुर हॅलो महराष्ट्र प्रतिनिधी, सतेज औंधकर : सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव येथे गेलेले महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना बेळगाव पोलिसांनी धक्काबुक्की करत ताब्यात घेतले. यानंतर बेळगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या घटनेचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध केला आहे.

राज्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर बेळगावात हुतात्मा चौकात होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमात सहभागी झाले होते. बंदी आदेश असल्यामुळे मंत्री पाटील हे आपला ताफा कोल्हापूरात सोडून एसटी ने बेळगावात दाखल झाले. अक्षरशः कर्नाटक पोलिसांना चकवा देते ते बस आणि रिक्षाने बेळगावात दाखल झाले.

बेळगावातील हुतात्मा चौकात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना यांच्यातर्फे हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पचक्र, पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर त्या ठिकाणी जात असताना त्यांना बेळगाव पोलिसानी जबरदस्तीने धक्काबुक्की करत ताब्यात घेतलं.

या प्रकारामुळे कर्नाटक पोलिसांची मुजोरी वाढल्याचे दिसून येत असून मराठी भाषिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्याचा कुटील डाव कर्नाटक सरकार करत असल्याचा संतप्त प्रतिक्रिया सीमावासीयांनी दिल्या आहेत.

बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणा आपण तब्बल 50 वर्षापेक्षा अधिक काळ ऐकतोय आणि आजही त्या आपल्या कानावर पडत आहेत. भाषावार प्रांत रचनेची घोषणा झाल्यावर सीमाभाग कर्नाटकात डांबला गेल्यामुळे सीमाभागात संतापाचे वातावरण निर्माण झाले. १७ जानेवारी १९५६ या दिवशी झालेल्या आंदोलनात बेळगाव आणि निपाणी येथे पोलिसांच्या गोळीबारात पाच जणांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. यामध्ये निपाणी येथील कमलाबाई मोहिते, बेळगाव येथील पैलवान मारुती बेन्नाळकर यांच्यासह अन्य तिघांचा समावेश होता. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हुतात्मा चौकात दरवर्षी या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते. हुतात्मा चौकात शुक्रवारीही सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे अभिवादन करण्यात आले.

Leave a Comment