कर्नाटक सीमा भागात १४ ठिकाणी नाकाबंदी, पोलीस दल निवडणुकांसाठी सज्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी | राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असून निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील भांगात विशेष दक्षता घेणारी पाऊल उचलण्यात अली आहेत. त्यानुसार ‘ सीमावर्ती भांगातून रक्कम घेऊन जात असताना 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम असेल तर त्यासोबत पुरावा म्हणून आवश्यक ती कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. अन्यथा अशी संशयीत रक्कम आयकर विभागाकडे वर्ग करण्यात येईल,’ अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.

सोबतच अनधिकृत होर्डिग काढण्यासाठी पोलीस दल जिल्हा प्रशासनाला मदत करत आहे. सीमा भागातील जिल्ह्यांची सोमवारी बैठक होणार आहे. विशेषत: कर्नाटक सीमा भागात 14 ठिकाणी नाकाबंदी करुन तपासणी करण्यात येणार आहे. अनधिकृत शस्त्रांबाबत कारवाईसाठी विशेष पथक निर्माण करण्यात आली आहेत. 1148 शस्त्र जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1400 ते 1500 पूर्वीच्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 2800 पोलीस कर्मचारी आणि 1800 गृह रक्षक दल तैनात असून पोलीस दल विधानसभा निवडणुकीसाठी सुसज्ज आहे,’ अशी माहिती अधिक्षक डॉ. देशमुख यांनी दिली.

Leave a Comment