कसोटी क्रिकेटमध्ये 5 लाख धावांचा टप्पा पार करणारी टीम बनली इंग्लंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : इंग्लंड क्रिकेट संघ कसोटीत 500,000 धावा करणारा जगातील पहिला संघ बनला आहे. जोहान्सबर्गच्या वँडरर्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात इंग्लंडने हे कामगिरी केली. इंग्लंडने त्यांच्या 1022 व्या कसोटी सामन्यात हा विक्रम केला आहे.

त्याचबरोबर 830 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया 432,706 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि भारत 540 कसोटी सामन्यात 273,518. सह तिसर्‍या स्थानावर आहे. वेस्ट इंडीज 545 कसोटी सामन्यांमध्ये 270,441 धावा घेऊन चौथ्या क्रमांकावर आहे.

परदेशी भूमीवर भारताने आतापर्यंत २88 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी त्याने 51 जिंकले आहेत, 113 गमावले आहेत आणि 104 अनिर्णित आहेत.