नवी दिल्लीः निर्भयाची आई आशादेवी यांनी नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. आता त्यांना अरविंद केजरीवाल यांच्या विरोधातच काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळण्याच्या शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख कीर्ती आझाद यांच्या एका ट्विटमुळे या शक्यतेला दुजोरा मिळाला आहे.
“ऐ मां तुझे सलाम”
आशा देवी जी आपका स्वागत है https://t.co/XovQXVsLp9— Kirti Azad (@KirtiAzaad) January 17, 2020
निर्भया घटनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आशा देवी यांना मदत केली होती. निर्भया कुटुंबीयांशी राहुल गांधी सतत संपर्कात आहेत. आशा देवी यांना याबाबत विचारले असता, या विषयावर अद्याप कुणाशी काहीच बोलणे झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
निर्भया बलात्कार प्रकरणी दोषींना १ फेब्रुवारीला फाशी
दुसरीकडे, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांची कन्या लतिका यांना काँग्रेसकडून नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते, अशी शक्यताही राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर, माजी परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी यांना भाजपतर्फे निवडणूक रिंगणात उतरवले जाऊ शकते.