#गणेशोत्सव२०१९ | भाद्रपद शुद्ध चतुर्थीला अनंत चतुर्थी म्हणतात. या दिवशी घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन करतात. पण तुम्हाला माहित आहे का ? गणेश विसर्जनाखेरीज या दिवसाचे आणखी ही काही महत्व आहे. या दिवशी अनंत म्हणजेच विष्णूची पूजा व अनंताचे व्रत केले जाते. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे, आपल्याला वैभव प्राप्त व्हावे म्हणून सलग १४ वर्ष १४ गाठी असलेला रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा केली जाते.
आपल्या सणावारांचा प्रारंभ पंचमीपासून होतो, आणि त्यातील एक पर्व अनंत चतुर्थीला संपते. अनंत चतुर्थीचे व्रत अनेक घरात पाळले जाते. या व्रतात १४ प्रकारची फुले, १४ प्रकारची फळे, १४ प्रकारची धान्य आणि १४ प्रकारचे नैवद्य दाखवून एका दोरकासह अनंताची पूजा केली जाते. हा दोरक म्हणजे दोरा अनंत म्हणून ओळखला जातो. हा उजव्या हाताच्या मनगटावर बांधतात. तो दोरा आपली सगळी संकट दूर करतो अशी अनेकांची श्रद्धा असते.
या व्रताची पूजा झाल्यानंतर याचे लगेच विसर्जन करतात.ही पूर्वी पासूनची परंपरा आहे. अनंत चतुर्थीचे महत्व आणि वाढवणारा योग म्हणजे गणेशमूर्तीचे विसर्जन या दिवशी आपल्या लाडक्या गणपतीला निरोप दिला जातो. नियमानुसार गणपतीचे जलाशयात विसर्जन केले जाते. सर्व गणेश भक्त गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. आपल्याकडे गणेश विसर्जनाचा जल्लोष इतका मोठा असतो की या जल्लोशात अनंत चतुर्थी म्हणजे अनंताच्या व्रताचा एक दिवस आहे. हे सहजासहजी कोणाच्या लक्षात येत नाही.