केवळ वीस दिवसांत ३० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला २ हजाराचा हप्ता 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्यात आला आहे. दरम्यान नोव्हेंबरपर्यंत बहुधा सर्वच बँक खात्यात हप्ता जमा होणार आहे. मागील वीस दिवसात ३० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २ – २ हजार रुपये टाकण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्यात जवळजवळ ८ कोटी ८१ लाख लाभार्थ्यांना  योजनेचा लाभ मिळला असून आपल्या बँक खात्यात पैसे आले नसतील तर एकदा आपल्या जवळील बँक शाखेत जाऊन आपल्या खात्याविषयी चौकशी करु घ्यावी असे सांगण्यात आले आहे. या योजनेच्या अंतर्गत ३० ऑगस्टपर्यंत साधरण १० कोटी ५० लाख शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली आहे. अर्जदारांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अर्जासह पुरविणे गरजेचे आहे.

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर शेत जमीन असणे आवश्यक आहे. पण जर तो व्यक्ती कुठे सरकारी नोकरीवर किंवा सेवानिवृत्त कर्मचारी असेल तर तो व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरणार नाही. जर व्यक्ती माजी आमदार, खासदार किंवा मंत्री असेल तेही या योजनेसाठी पात्र नाही आहे.  जर अर्ज करणारा  व्यक्ती हा परवानाधारक डॉक्टर असेल, अभियंता, वकील, चार्टट अकांउंटट असेल तर तोही या योजनेस पात्र ठरत नाही. या योजनेच्या लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या नावावर जमीन असणे आवश्क असते. जर शेत जमीन आजोबांच्या  किंवा शेतकऱ्याच्या वडिलांच्या  नावावर असेल तर योजनेचा लाभ मिळत नाही.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी असून त्यांना या योजनेतून आर्थिक साहाय्य दिले जाते.  साधारण १४ कोटी शेतकऱ्यांना या योजनेतून निधी दिला जात आहे.  शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ही योजना खूप फायदेशीर आहे.  यातून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची मदत केंद्र सरकारकडून केली जाते. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत ६ हजार रुपये तीन टप्प्यात दिले जाते. प्रत्येक टप्प्यात २ हजार रुपये दिले जात असून हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात.  पैसे आपल्या खात्यात आल्याची माहिती मोबाईलवर मेसेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जाते. योजनेची नोंदणी करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. भारत सरकारचे संकेतस्थळ www.pmkisan.gov.in/ वर जाऊन नोंदणी करू शकता.  किंवा https://www.pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx येथे आपण नोंदणी आणि अर्ज भरून आपली नोंदणी करु शकता.  याशिवाय तुम्ही राज्य सरकार द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या पीएम – योजनेच्या नोडल अधिकाऱ्यासी संपर्क करु शकता. किंवा आपल्याजवळील सामान्य सेवा केंद्रावर जाऊन आपला अर्ज करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’