कॉ. पानसरे हत्या प्रकरण ; शार्प शूटर अंदुरेसह मिस्किन ,बद्दी यांना न्यायालयीन कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी। कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी कोल्हापूर एसआयटीने अटक केलेल्या तिघा संशयीताना शुक्रवारी सकाळी जिल्हा न्यायालयात हजर केले. नववे सत्र न्यायाधिश एस. एस. राऊळ यांनी तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सायंकाळी त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुणे व मुंबईला रवानगी करण्यात आली. सचिन प्रकाशराव अंदुरे (वय ३२, रा. जैन मंदिराजवळ, राजबाजार, जि. औरंगाबाद), अमित रामचंद्र बद्दी (२९, रा. हबीब चाळ, जि. हुबळी) आणि गणेश दशरथ मिस्कीन (३०, रा. चैतन्यनगर, जि. हुबळी) या तिघांना कोल्हापूर एसआयटीने ७ सप्टेंबर रोजी अटक केली. संशयितांना अंबाबाई मंदिर, पानसरे यांच्या बिंदू चौक कार्यालय परिसरात तपासासाठी फिरवण्यात आले.

संशयीतांना प्रथम १० दिवस १६ सप्टेंबरपर्यंत व त्यानंतर ४ दिवस असे १४ दिवस पोलीस कोठडी घेवून त्यांच्याकडे पानसरे हत्येप्रकरणी तपासाच्या अनुषंगाने कसून चौकशी करण्यात आली.यामध्ये महत्वाची माहिती हाती लागल्याचे समजते. सीपीआर रुग्णालयात तिघांची वैद्यकीय तपासणी करून सचिन अंदुरे याला पुण्याच्या येरवडा कारागृहात तर बद्दी व मिस्किन या दोघांना मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आले.यावेळी न्यायालयात विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे, संशयीतांचे वकील ॲड. समीर पटवर्धन हजर होते.

Leave a Comment