कोरोनाचा हाहाकार! गेल्या २४ तासांत देशात ९२ हजार ७१ नवीन रुग्ण आढळले तर १ हजार १३६ जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतात कोरोना महामारीवर अजूनही नियंत्रण मिळ्वण्यात यश आलेले नाही आहे. दिवसेंदिवस कोरोनाची वाढत जाणारी प्रकरणं चिंता आणखी वाढवत आहेत. अशा वेळी मागील २४ तासांत देशात ९२ हजार ७१ नवीन रुग्ण आढळले तर १ हजार १३६ जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४८ लाख ४६ हजार ४२८ इतकी झाली आहे. यामध्ये ९ लाख ८६ हजार ५९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ७९ हजार ७२२ जणांचा बळी गेला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात करोनामुक्त होणाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. भारतातील कोरोनामुक्त रुग्णांचं प्रमाण ७७ टक्केंपेक्षा जास्त आहे. देशात आतापर्यंत ३७ लाख ८० हजार १०८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली आणि गुजरातसारख्या राज्यात कोरोनाचा सर्वाधिक जास्त प्रभाव आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० लाखांच्या पुढे गेली आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात असून एकूण मृत्यूपैकी ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment