बीड : एबीपीचे बनावट ग्राफिक्स तयार करून खोटी पोस्ट टाकून कोरोना झाल्याची अफवा पसरवणा-याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील आष्टी शहरामध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याची खोटी पोस्ट व्हायरल करणे महागात पडले आहे.
त्याचप्रमाणे पंढरपुरातही याप्रकारची घटना घडली आहे. एबीपी माझाच्या लोगोचा गैरवापर करून पंढरपूर मध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याची खोटी बातमी व्हायरल झाली होती. त्याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. यामुळे पंढरपूरमध्ये घबराट पसरली होती.