कोल्हापूर प्रतिनिधी, सतेज औंधकर : शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकेरी शब्द वापरल्याच्या निषेधार्थ भाजपाचे नेते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झालीय. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने संजय पवार आणि विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली आज बिंदू चौकामध्ये भाजप नेते आशिष शेलार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं.
आशिष शेलार यांच्या पोस्टरला मी भडवा आहे असं संबोधण्यात आलं होतं तसेच शेलार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या पोस्टला महिला आघाडीच्या वतीने काळे फासण्यात आले. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल एकेरी बोलणं थांबवावं अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरणं मुश्कील करू असा सज्जड दम शिवसेनेच्या वतीनं देण्यात आलाय.