खाऊगल्ली | पहिल्या दिवसाच्या दुधाच्या चिकापासून खरवस बनवला जातो. खरवस खाण्यास खूप रुचकर आणि स्वादिष्ठ लागतो. या चिकाच्या वड्या देखील बनवतात येतात.
साहित्य –
१) २ वाट्या पहिल्या दिवसाचा दुधाचा चिक
२) १ लिटर दुध
३) दोनशे ते अडीचशे ग्राम गुळ किंवा साखर
४) १/२ टीस्पून वेलचीपूड
कृती – चिक आणि दुध एकत्र करून त्यात गुळ किंवा साखर घालावी. गुळ किंवा साखर विरघळेस्तोवर ढवळावे. चव पाहून लागल्यास अजून साखर घालावी. वेलची पूड घालून मिक्स करावे.तयार मिश्रण कुकरमध्ये भात शिजवतो तसेच शिजवून घ्यावे. कुकरच्या तळाशी दीड इंचभर पाणी घालावे.मिश्रणाचा डबा अलगदपणे पकडीच्या मदतीने आत ठेवावा. त्यावर ताटली ठेवावी. झाकण लावून २ शिट्ट्या कराव्यात. आच बारीक करून मिनिटभराने बंद करावी. ५-८ मिनिटांनी कुकरचे प्रेशर गेल्यावर झाकण काढूनदाब बाहेर काढावा. गार होईस्तोवर हवेवर उघडेच ठेवावे.कोमटसर झाले की खाल्ले तरी चालते. पण फ्रीजमध्ये गार करून खाल्ल्यास अजून स्वादिष्ट लागतात.
खरवस फ्रीजमध्ये ८ दिवस सहज टिकतो.
( टीप – खरवस उष्ण असतो त्यामुळे गरोदर स्त्रियांनी हे खाणे टाळावे. )