हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरातील बहुतांश नागरिक विरोधी भूमिकेत गेल्याचं पहायला मिळत असतानाच शाहीनबागच्या धरतीवर खुरेजीमध्ये देखील लोक एकत्र आल्याचं पहायला मिळत आहे. मंगळवारी ४ वाजून ३० मिनिटांनी या ठिकाणी लोक एकत्र आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही कधी येणार? आमच्या मनातल्या गोष्टी ऐकायला असा सवाल उपस्थितांनी विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्टकार्डद्वारे पत्र पाठवून शाहीनबाग मधील महिलांनी CAA आणि NRC ला आपला विरोध दर्शवला होता. त्याच धरतीवर नवी दिल्लीतील खुरेजा परिसरातील लोकांनी एकत्र येऊन पत्रव्यवहारांचं शस्त्र हाती घेतलं आहे.
सोशल मीडियावर सगळीकडे #TumKabAaoge ट्रेंड जोरदार पुढे जात असून मोदी आणि शहांना अनुल्लेखाने मारण्याचा प्रकारही या पोस्टमधून दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मनातील गोष्टी सांगतात, मात्र आमच्या मनातील काहीच ऐकून घेत नाहीत ही शंका लोकांनी उपस्थित केली आहे.
मन की बात, परीक्षा पे चर्चा अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन नरेंद्र मोदी लोकांच्या समस्यांची आपल्याला जाण असल्याचं दाखवत आहेत. मात्र देशपातळीवर पसरलेला असंतोष पाहता नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन सरकारला एक पाऊल मागे टाकावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे.