सोलापूर प्रतिनिधी । पंढरपूर शहरामध्ये अवैध वाळू वाहतूक होत आहे. त्यामुळे वाळू माफियांचा धंदा जोमात चाललाय मात्र प्रशासन कोमात असल्याच दिसत आहे. रोज होणाऱ्या या वाळू उपशामुळे चंद्रभागा नदीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. तसेच नदीत मोठमोठे खड्डे होत असल्यामुळे नदीत अंघोळीसाठी गेलेल्या नागरिकांचे नदीत बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.
त्यामुळे जेथे नव्हते चराचर तेथे होते पंढरपुर असे म्हणणाऱ्या वारकरी संप्रदायाकडून नाराजी व्यक्त होत आहे. रेल्वे पूल, जॅकवेल बंधारा काही अंतरावर झोपडपट्टीमधून कुंभार गल्ली, इसबावी येथून दिवस-रात्र वाळू वाल्यांचा धंदा जोमात सुरु आहे. मात्र महसूल प्रशासन कोमात असल्याचं दिसत आहे.
होडी, पिकप गाडीद्वारे, गाढवावरून, मोटरसायकल व ऑटो रिक्षाद्वारे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. त्यामुळे अनिलनगर तसेच व्यास नारायण झोपडपट्टीमधील नागरिक त्रस्त झालेले दिसत आहेत. या वाळूमाफियांचा तात्काळ बंदोबस्त करा अशी मागणी नागरिक करत आहेत.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.