चांद्रयानाचा संपर्क तुटल्याने ‘इस्रो’ प्रमुख के. सिवन भावूक, मिठी मारत मोदींनी दिला धीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था | भारताच्या चंद्रयान 2 या मोहिमेअंतर्गत चंद्रावर उतरण्यासाठी अवघे २.१ किलोमीटर अंतर बाकी असताना लँडर विक्रमशी इस्रोशी असणारा संपर्क तुटला आहे. चंद्रयान 2 मोहिमेत सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अखेरच्या १५ मिनिटांत ही घटना घडली आहे. इस्रोचे शास्त्रज्ञ विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत . मात्र या घटनेनंतर इस्त्रो प्रमुख के. सिवन यांना आपल्या भावना अनावर झाल्या. ते आपलं दुखं लपवू शकले नाहीत. डोळ्यांत तरळणाऱ्या अश्रुंसाहित ‘इस्रो’चे प्रमुख के. सिवन यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारत आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सिवन यांचे सांत्वन केलं.

चंद्रयान रात्री एक वाजून ५५ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार होतं. ३० किलोमीटर अंतरावर स्थिरावलेल्या लँडरने चंद्राच्या दिशेने कूच करताना ‘रफ ब्रेकिंग फेस’ या अडथळ्यावरही मात केली परंतु जसजसे लँडर चंद्राच्या जवळ पोहोचले आणि अवघे २.१ किलोमीटर अंतर बाकी असताना विक्रम कडून सिग्नल येणे बंद झाले आहे.

शास्त्रज्ञांच्या या कामिगीरीवर बोलताना नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवणारं भाषणं केलं. ‘मी आणि संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे. निराश होऊ नका. विज्ञानात अपयश नसतेच, असतो तो केवळ प्रयोगच,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी शास्त्रज्ञांना धीर दिला. या संपूर्ण अभियानादरम्यान देश अनेकदा आनंदीत झाला आहे. आताही आपले ऑर्बिटर मोठ्या दिमाखात चंद्राची परिक्रमा करत आहे. भारत जगातील महत्त्वाच्या अवकाश शक्तींपैकी एक असल्याचे मोदी म्हणाले.

Leave a Comment