चारमीनार माझ्या बापाने बनवली, तुझ्या नाही – अकबरुद्दीन ओवेसी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. लोक कागदपत्रं पाहण्यासाठी घरी येतील, त्यांना सांगा की आम्ही या देशात ८०० वर्षे राज्य केले आहे. ही चारमीनार माझ्या वाडवडिलांनी बनवली आहे, तुझ्या बापाने नाही, असे वक्तव्य अकबरुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात हैद्राबाद येथे घेण्यात आलेल्या सभेत ओवेसी बोलत होते.

अकबरुद्दीन आपल्या भाषणात म्हणाले की, ‘कुणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. ते काय बोलतात ते मान्य करण्याचीही आपल्याला गरज नाही. मुसलमानांकडे काय आहे, असे जे लोक विचारतात, त्यांना मी सांगतो की तू माझे कागदपत्रं तपासू इच्छितो. मी ८०० वर्षांपर्यंत या देशात राज्य केले आहे, शौर्य गाजवले आहे. हा देश माझा होता, माझा आहे आणि माझा राहील. माझे वडील आणि माझ्या आजोबांनी या देशाला चारमीनार दिली, कुतुबमीनार दिली, जामा मशीद दिली. या देशाचा पंतप्रधान ज्या लाल किल्ल्यावर झेंडा फडकावतो, तो लाल किल्ला देखील आमच्याच पूर्वजांनी दिला आहे.’

Leave a Comment