जम्मु काश्मिरमधे काँग्रेसची पीडीपी सोबत युती? दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची बैठक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली : भाजपाने पीडीपीचा पाठींबा काढून घेतल्याने जम्मु काश्मिरमधे मेहमुबा मुफ्ती यांचे सरकार पडले होते. त्यानंतर राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. आता काँग्रेस पीडीपी सोबत युती करण्याच्या तयारीत असल्याचे समजत आहे. जम्मु काश्मिर मधे काँग्रेस – पीडीपीची युती झाली तर त्याचा भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

जम्मु काश्मिरमधे पीडीपी सोबत युती करावी काय? याविषयी चर्चा करण्यासाठी आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्ली येथे बैठक बोलावण्यात आली होती. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, अम्बिका सोनी, कर्ण सिंह, पी. चिदंबरम आणि गुलाम नबी आजाद आदी वरिष्ठ नेते बैठकीस उपस्थित होते. काँग्रेस – पीडीपी युतीसंदर्भात अद्याप ठोस असे काहीच हाती आलेले नसले तरी ही युती होण्यासाठी काँग्रेसने चांगलीच फिल्डींग लावली असल्याचे समजत आहे. जम्मु काश्मिरमधे सरकार स्थापन करण्यासाठी व बहुमत सिद्ध करण्यासाठी ૪૪ आमदारांची गरज आहे. सध्या पीडीपीकडे २८ तर काँग्रेसकडे १२ आमदार आहेत. बहुमतासाठी माकप १ व अपक्ष ३ असे चार आमदार लागणार आहेत. जम्मु काश्मिरमधे लवकरात लवकर निवडणुका होणे गरजेचे असल्याचे अम्बिका सोनी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणले आहे.

Leave a Comment