जम्मू-काश्मीरमध्ये एमटीडीसी दोन रिसॉर्ट उभारणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | जम्मू-काश्मीरमध्ये एमटीडीसी दोन रिसॉर्ट होणार उभारणार आहे अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरच्या पेहलगाम आणि लडाख येथे एमटीडीसीचे रिसॉर्ट उभारण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये रिसॉर्ट उभारण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.

या रिसॉर्टमुळे जम्मू-काश्मीरमधील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. त्याचसोबत पर्यटनामुळे अर्थव्यवस्था आणि काश्मीरच्या विकासालाही चालना मिळेल, असे रावल यांनी आधीच म्हणणे होते. अखेर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या या योजनेला चालना मिळाली असून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एमटीडीसीचे दोन रिसॉर्ट काश्मीर मध्ये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्यावेळी कलम ३७० रद्द करण्यात आले तेव्हा प्रतिक्रिया देताना रावल यांनी सांगितले होते की, हे कलम रद्द केल्यामुळे एमटीडीसीला नवीन संधी उपलब्ध झाली आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये मालमत्ता विकत घेऊन रिसॉर्ट उभारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ विचार करत असल्याचे रावल यांनी सांगितले होते. महाराष्ट्रातून जम्मू काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये थ्री आणि फोर स्टार सोयीसुविधा असलेले रिसॉर्ट उभारण्याची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची योजना असल्याचे रावल यांनी सांगितले होते.

Leave a Comment