डाळींच्या व्यवसायातून ‘असा’ मिळवा उत्तम नफा 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। गेल्या काही वर्षांपासून भारतात डाळींच्या बाजाराला चांगली मागणी आहे. म्हणूनच डाळींचे दरही बऱ्यापैकी वाढत आहेत. त्यामुळे सध्या डाळींच्या व्यवसायला चांगले दिवस आले आहेत. व्यवसायातून महिन्याला जवळपास ५० हजार रुपये पर्यंतचा नफा मिळू शकतो. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी सुरुवातीला साधारण ५ लाख रुपये गुंतवण्याची गरज असते मात्र त्यातून नंतर मोठ्या प्रमाणात नफा कमवता येऊ शकतो. व्यवसायाच्या सुरुवातीला तुमच्याकडे पैसे नसतील तर सरकारही तुम्हाला मदत करू शकते. केंद्र आणि राज्य सरकारच्या काही योजना देखील यासाठी लागू करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे स्वतःचा संपन्न व्यवसाय तुम्ही सुरु करू शकता.

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी आपल्याकडे एखादी जागा अर्थात दुकान असणे आवश्यक आहे. स्वतःची जागा असेल तर भाड्याचा प्रश्न राहत नाही. जागा बघताना आजूबाजूचा परिसरही पारखून घ्यावा. आजूबाजूला आणखी काही धान्ये दुकाने आहेत का पाहावी म्हणजे आपल्याला विक्री करणे सोपे जाईल.  दुकान चालविण्यासाठी आपल्याकडे जीएसटी नंबर असावा लागतो. जीएसटी पोर्टल नोंदणी केल्यावर हा नंबर मिळतो. प्लास्टिक बंद अथवा उघड्या डाळीवर जीएसटी लागत नाही मात्र बँडेड डाळींवर ५% जीएसटी लागतो. भाड्याचे दुकान असेल तर त्याचा करार असावा लागतो. एमसीडी कडून दुकान चालविण्याचे लायसन्स घ्यावे लागते. तर अन्न परवाना सरकारी अन्न ऍथॉरिटी एफएसएसएआयएस यांच्याकडून घ्यावे लागते.

बहुधा सर्वच राज्यांमध्ये डाळींच्या मिल असतात. या मिल पॉलिश डाळ होलसेल आणि रिटेल बाजारात पुरवितात. याची माहिती सोशल मीडियावर देखील मिळू शकते. याशिवाय दिल्ली-एनसीआर मध्ये नरेला आणि बादली इंडस्ट्रीज परिसरात अनेक मिल आहेत. ज्यांच्याशी संपर्क साधून होलसेल मध्ये डाळ खरेदी करता येते. ब्रँडच्या नावासहित डाळ विकत येते. चांगली गुणवत्ता असेल तर लवकर याचा लाभ मिळतो. ऑनलाईन ही विक्री करता येऊ शकते. ऑनलाईन विक्रीसाठी बिग बास्केट, ऍमेझॉन पॅन्ट्री तसेच इतर प्लॅटफॉर्मची मदत घेता येऊ शकते. यामधून महिना ४० ते ५० हजार रुपये कमाई करता येऊ शकते. रोज साधारण १५०० ते २००० रु पर्यंतची डाळींची विक्री होऊ शकते.

Leave a Comment