ड्रग्ज व्यापारी, खंडणी मागणारे, मर्डर केस, हीच आजच्या शिवसेनेची ओळख ; निलेश राणेंनी साधला शिवसेनेवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राणे कुटूंबिय आणि शिवसेना हा वाद काही नवा नाही. त्यातच भाजपाचे नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं आहे. बुधवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. नाणार रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीत आणू पाहणारे मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात असल्याचा दावा राणे यांनी केला होता. आता ड्रग्ज व्यापारी, खंडणी मागणारे, मर्डर केस, हीच आजक्सच्या शिवसेनेची ओळख आहे , अस म्हणत त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

शिवसेना उपनेत्याच्या मुलाची ड्रग्ज प्रकरणी पोलिसांकडून चौकशी असं वृत्त एका वृत्तपत्रात छापून आलं आहे. त्या वृत्तपत्रातील वृत्ताच्या आधारावर राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. “काय ओळख होती शिवसेनेची आणि आता काय झाली आहे. ड्रग्ज व्यापारी, खंडणी मागणारे, मर्डर केस, ही ओळख आजच्या शिवसेनेची. मराठीमध्ये म्हण आहे ‘अति तिथे माती‘… शिवसेनेचा अंत जवळ आलाय,” असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली.

यापूर्वी बुधवारीही पत्रकार परिषदेत राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. “नाणारचा विषय आमच्यासाठी संपला असल्याचं शिवसेनेचे स्थानिक मंत्री, आमदार, खासदार नेहमी बोलत असतात. पण नाणारची एक कमिटी जी प्रकल्प आणू पाहत आहे, ती सातत्याने मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात आहे. मुख्यमंत्री कार्यालय त्यांच्याशी चर्चा करत आहे. प्रकल्प रद्द झाला आहे तर मग ती चर्चा कशासाठी होत आहे ? प्रकल्प रायगडमध्ये नेण्यासाठी ही चर्चा होत नाही. राजापूरमध्ये प्रकल्प आणावा यासाठी ही चर्चा होत आहे. नाणार राजापूरमध्ये परत कसं आणलं जावं यासाठी एकत्र येऊन योजना आखली जात आहे,” असं निलेश राणेंनी म्हटलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment