“तारीख पे तारीख, तारीख पे तारीख..” निर्भयाच्या आईची संतप्त प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र : गुन्हेगारांना पाहिजे तेच होत आहे, गेल्या सात वर्षांपासून मला तारखेवर तारीख देण्यात येत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया निर्भयाची आई आशा देवी यांनी दिली आहे. निर्भया प्रकरणातील दोषींना आता १ फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे. राष्ट्रपतींकडे दोषी मुकेशने दया याचिका दाखल केल्यामुळे २२ जानेवारी ही फाशीची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्यामुळे दोषींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तरीही या घटनेवर निर्भयाच्या आईने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आमच्या मानवाधिकाराचं काय?

या प्रकरणात नवीन मृत्यूदंड वॉरंट जारी झाल्यानंतर निर्भयाची आई आशा देवी म्हणाल्या की, जोपर्यंत दोषींना फाशी दिली जात नाही तोपर्यंत माझ्या मुलीला न्याय मिळणार नाही. मला गेल्या सात वर्षांपासून तारीखेवर तारीख देण्यात येत आहे. त्या म्हणाल्या की, आपली व्यवस्था अशी आहे की जेथे गुन्हेगारांचे ऐकले जाते. निर्भयाच्या गुन्हेगारांच्या मानवाधिकाराचा विचार केला जातो आमच्या मानवाधिकारच काय, असा सवाल निर्भयाच्या आईने उपस्थित केला आहे.

 

Leave a Comment