सोलापूर प्रतिनिधी । परतीच्या पावसामुळ पंढरपूर तालुक्यातील सोनके येथील तलाव शंभर टक्के भरला आहे. तलाव भरल्याने तालुक्यातील 10 गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा पाणी प्रश्न सुटला आहे. परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यान तलावात एक टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी तलावात केवळ 25 टक्के पाणी साठा झालेला होता. त्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार आंदोलन कराव लागल होत. तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यान रब्बी हंगामात दोन तर उन्हाळी हंगामात एक पाणी पाळी मिळणार आहे. त्यामुळं पाण्याच योग्य नियोजन करण्यात याव अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी तर हा तलाव कोरडा पडला होता. त्यामुळे या तलावात पाणी सोडण्यासाठी अनेकवेळा आंदोलन करण्यात आले होते. व प्रशासानाला त्याची दखल घेणेही भाग पडल होत. कारण या भागात पावसाळा संपला तरी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. भिमा-निरा नदीला पुर येऊन देखील तिसंगी तलाव पाण्यान भरला नसल्याने संतप्त अज्ञात आंदोलकांनी महामंडळाची बसही फोडली होती.
पेरणी अगोदरच संपूर्ण रब्बी हंगाम वाया गेला होता. खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे खरीप पिकेही जळून गेली होती. जिल्ह्यातील भीमा तसच सीना नदी कोरडी पडली होती. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. पण आता मात्र हा तलाव ओव्हर फ्लो झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाच वातावरण निर्माण झाले आहे.